Dharmabad Red Chilli
Dharmabad Red ChilliSaam tv

Dharmabad Red Chilli : धर्माबादच्या लाल मिरचीची विदेशातही मागणी; वर्षाकाठी होते २०० कोटींची उलाढाल

Nanded News : धर्माबाद येथे गावरान, ब्याडगी, काश्मिरी डब्बी, तेजा, जिटी, सी ५, २७३, सुपर टेन, अरमुर आणि वंडरहाट अश्या १० प्रकारची मिरची उपलब्ध असते

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेडच्या धर्माबादच्या लाल मिरचीला देश विदेशात मोठी मागणी आहे. हि लाल मिरची व त्याची पावडर चांगली टिकून राहते. यामुळे धर्माबादच्या या मिरचीला अधिक मागणी असते. यामुळेच धर्माबाद बाजारपेठेत वर्षकाठी तब्बल २०० कोटी रुपयांची उलाढाल ही केवळ लाल मिरची अन पावडर विकून होत असते.

Dharmabad Red Chilli
Khamgaon Heavy Rain : खामगावात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस; अनेकांच्या घरात शिरले पाणी

नांदेडच्या (Nanded) धर्माबादची मिरची देश विदेशात देखील प्रसिद्ध आहे. भारतीय सैन्य दलात तर खास धर्माबाद येथील मिरची मागवली जाते. तर आखाती देशांतही इथल्या मिरचीला मोठी मागणी आहे. धर्माबादच्या पंचक्रोशीतील शेतकरी (Farmer) मिरचीचे उत्पादन घेतात. याच धर्माबादच्या मिरची बाजारात विक्री करतात. या मिरचीची इथल्या कारखान्यात त्याची पावडर बनवली जाते. इथून पुढं ती पावडर संपूर्ण भारतात विक्री केली जाते. मौसमात इथे दिवसाला ३०० टन मिरची उपलब्ध होते. विशेष म्हणजे इथ यायचं मिरची पसंद करायची अन् इथंच पावडर बनवून घेऊन जायचं किंवा थेट पावडर खरेदीची मुभा इथं आहे.

Dharmabad Red Chilli
Parbhani News : नाल्याच्या पुरात दोन महिला गेल्या वाहून; एका महिलेचा मृत्यू

दहा प्रकारच्या मिरचीचे उत्पादन 
मिरची हे सहा महिन्यात येणारे पीक आहे. शिवाय जनावर देखील या पिकाला खात नाही. धर्माबाद येथे गावरान, ब्याडगी, काश्मिरी डब्बी, तेजा, जिटी, सी ५, २७३, सुपर टेन, अरमुर आणि वंडरहाट अश्या १० प्रकारची मिरची उपलब्ध असते. यातील तेजा ही सर्वात तिखट असते. तर काश्मिरी डबी ही अत्यंत कमी तिखट असते. धर्माबाद इथ १२ मिरची पावडर तयार करणारे कारखाने आहेत. यातून दोन हजार कामगारांना बारमाही रोजगार मिळतो. 

शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा 
धर्माबादच्या या मिरची बाजारात मिरची व्यवहारातून वर्षाकाठी २०० कोटी रुपयांची उलाढाल होते. ही बाजारपेठ इथल्या व्यापाऱ्यांनी विकसित केली आहे. पण शासनाने इथ मिरची टेस्टिंग लॅब सुरू केली; तर विदेशात पाठवण्यासाठी मोठी मदत होईल. यातून सर्वांचेच उत्पन्न वाढेल असे कारखानदार सांगतात. आजघडीला शेतकऱ्यांना १०० ते १५० रुपये किलो मिरचीला भाव मिळतो. उत्पादन ते प्रक्रिया अगदी जवळ असल्याने शेतकऱ्यांना देखील यांच्यातून चांगला आर्थिक फायदा होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com