Accident News: चिमुरडा हवेत उडाला अन्‌..; राँगसाईड छोटा हत्तीची दुचाकीला धडक

चिमुरडा हवेत उडाला अन्‌..; राँगसाईड छोटा हत्तीची दुचाकीला धडक
Accident News
Accident NewsSaam tv

जळगाव : जळगाव- शिरसोली रोडवर जळगावकडे येत असताना दुचाकीस्वारास छोटा हत्ती मालवाहू वाहनचालकाने राँगसाईड जाऊन धडक (Accident) दिली. या अपघातात दुचाकीवर बसलेला दीड वर्षीय बालक चेंडूसारखा उडून खाली रोडवर पडला, तर दुचाकीस्वार वाहनासह फेकला गेल्याने गंभीर (Accident Death) जखमी झाला. या अपघातात शेख अली शेख शरीफ दीड वर्षीय बालक जागीच ठार झाला. (Live Marathi News)

Accident News
Akola News: ७० वर्षीय वृद्धाचा प्रताप; महिला वाहकाचा केला विनयभंग

शेख अमीन शेख आरीफ (वय २५) यांना १५ दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. रविवारी अमीन शेख याने पत्नी व मुलीची भेट घेण्यासाठी सासरवाडीत शिरसोली येथे जाण्याचा बेत आखला. घरातून निघताना दीड वर्षीय पुतण्या अली यासही फिरवून आणू, असा विचार करून दोघे काका- पुतणे दुचाकीने शिरसोलीला (Jalgaon) आले होते. मुलीला भेटून सायंकाळी घराकडे येण्यासाठी दुचाकीने निघाले.

टाकीवर बसलेला चिमुकला हवेत उडाला

गावातून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर पेट्रोल पंपाजवळ समोरून सुसाट वेगात येणाऱ्या छोटा हत्ती या मालवाहू वाहनचालकाने दुचाकीस्वारास राँगसाईड जाऊन जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार वाहनासह फेकला गेला. तर दुचाकीवरील दीड वर्षीय अली हा चिमुरडा फुटबॉलसारखा हवेत उडून डोक्यावर पडल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक अमीन शेख गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्‍हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली. तर अपघातानंतर वाहन चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, शिरसोली ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

चालते वाहने सोडून लोक पळाले

दुचाकीच्या टाकीवर बसविलेला दीड वर्षीय अली हवेत उडताना ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना दिसला. जागीच वाहन थांबवून बाजारात फुल घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराने तशीच दुचाकी फेकत या बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशिर झाला. छोटा हत्ती चालकाचे वाहन राँगसाईडला जाऊन दुचाकीला धडकत असल्याचे लोकांनी डोळ्यांनी बघितले.

पित्याचा आक्रोश

जखमी अमीन शेख व त्याचे मोठे बंधू शरीफ शेख आरीफ असे दोघेही भाऊ एकत्र कुटुंबात एमआयडीसीच्या मागील फातेमानगरात वास्तव्याला आहेत. ते ट्रॅक्टर मेकॅनीक म्हणून काम करून गुजराण करतात. भावाचा अपघात झाल्याचा फोन आल्यावर शरीफ याच्यासह कुटुंबीय आणि गल्लीतील तरुणांनी अपघातस्थळी धाव घेतली. जिल्‍हा रुग्णालयात आल्यावर चिमुरडा अली झोपलेल्या अवस्थेत पडून असल्याचे पाहत पित्याने एकच टाहो फोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com