Akola News: ७० वर्षीय वृद्धाचा प्रताप; महिला वाहकाचा केला विनयभंग

७० वर्षीय वृद्धाचा प्रताप; महिला वाहकाचा केला विनयभंग
Akola Crime News
Akola Crime NewsSaam tv
Published On

अकोला : बसस्थानकावर तेल्हारा- शेगाव जाणाऱ्या बसमध्ये चढून एका 32 वर्षीय महिला बस वाहकाचा विनयभंग (Crime News) केला. विनयभंग करणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाविरुद्ध अकोल्यातील तेल्हारा (Police) पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली. (Letest Marathi News)

Akola Crime News
Auranagabad News : पत्नीच्या आत्महत्येची बातमी कळताच पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; काळीज पिळवटून टाकणारी घटना

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC Bus) तेल्हारा आगारात वाहक म्हणून ड्युटी करणाऱ्या 32 वर्षीय महिला वाहक बसमध्ये ड्युटी करीत होती. या दरम्‍यान तेल्हारा बसस्थानकावर फलाटावर उभी होती. बस (Akola) निघण्याच्या तयारीत असताना आरोपी जयदेव ज्योतीराम फोकमारे हा वृद्ध गाडीत चढला व त्याने वाईट उद्देशाने वाहक महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केली.

गालावर मारली थापड

एवढेच नव्हे तर तिच्या गालावर थापड मारली. या प्रकरणी महिला वाहकाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथडा, विनयभंग, शिवीगाळ, मारहाण व एट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com