Bhusawal Accident : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; तीन जण जखमी

Jalgaon News : भुसावळ- यावल मार्गावर घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या तिघांना नागरिकांच्या मदतीने तात्काळ भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले आहेत. हा (Accident) अपघात यावल- भुसावळ (Bhusawal) मार्गावरील अंजाळे जवळच्या मोर नदी पुलावर घडला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Breaking Marathi News)

Accident News
Jalgaon News : रेल्वे बोगीवर चढलेल्या हमालाचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू; जळगावच्या मालधक्क्यावर काम करतानाची घटना

यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकींना धडक दिली. अरविंद प्रभाकर पाटील (वय ४५ रा. बोरावल) हे मोटरसायकलने दुध विक्री करीता जात होते. तसेच त्यांच्या मागे अंजाळे येथुन भुसावळकडे पिंटू शेकोकार व त्यांचा (Jalgaon) मुलगा सोहम शेकोकार हे दोघे देखील भुसावळ येथे दुध विक्रीस जात होते. मोर नदी पुलावर आले असता भुसावळकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेला सोहम शेकोकार हा पुलावरून नदीपात्रात कोसळला. तर दोन्ही दुचाकी चालक रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Accident News
Kolhapur News : पंचगंगा, भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर शेतीसाठी उपसाबंदी; पाटबंधारे विभागाने काढला आदेश

कार चालक फरार 

भुसावळ- यावल मार्गावर घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या तिघांना नागरिकांच्या मदतीने तात्काळ भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार चालक पसार झाला असून यावल पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com