Kolhapur News : पंचगंगा, भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर शेतीसाठी उपसाबंदी; पाटबंधारे विभागाने काढला आदेश

Kolhapur News : पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही क्षेत्रात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रांवर २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान उपसाबंदी करण्यात आली आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam tv
Published On

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा आणि भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम २०२३-२४ मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे. आजपासून उपसा यंत्रावर (Kolhapur) कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या (उत्तर) कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत. ही बंदी आजपासून लागू करण्यात आली आहे. (Live Marathi News)

Kolhapur News
Dhule Dadar Express : धावत्या धुळे- दादर एक्सप्रेसमधून निघाला धूर, प्रवाशांचा उडाला गोंधळ; निफाड रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

पंचगंगा (Panchaganga) व भोगावती नद्यांच्या दोन्ही क्षेत्रात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रांवर २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान उपसाबंदी करण्यात आली आहे. यात कोल्हापुरातील राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग तर कासारी नदीवरील दोन्ही तीरावर आणि कुंभी नदीवरील दोन्ही तीरावर पंचगंगा व भोगावती नदीवरील भागात ‍मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात २ ते ३ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur News
Jalgaon News : रेल्वे बोगीवर चढलेल्या हमालाचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू; जळगावच्या मालधक्क्यावर काम करतानाची घटना

तसेच पंचगंगा नदीवरील ‍शिंगणापूर, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तिरावरील भाग तसेच पंचगंगा नदीवरील भागात ‍मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात दिनांक ४ ते ५ फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.

तर उपसा परवाना करणार रद्द 

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना १ वर्षाच्या कालावधीसाठी रदद् करण्यात येईल. तसेच होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com