जळगाव : रेल्वेच्या मालधक्क्यावर काम करणाऱ्या हमालाचा हायहोल्टेज ताराला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू (Jalgaon) झाल्याची घटना घडली. रेल्वे बोगीतून माल उतरविल्यानंतर बोगीवर राहिलेली चप्पल घेण्यासाठी गेला असता हा (Railway) अपघात घडला. या प्रकरणी रेल्वे पोलीसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)
जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेटच्या पुढे असलेल्या मालधक्क्यावर ही घटना १ फेब्रुवारीला घडली. संतोष रामू कुमार (वय.४५, रा.बाबरी, जि.नर्मदापुरम, मध्यप्रदेश) असे मृत झालेल्या हमालाचे नाव आहे. संतोष कुमार हा त्याच्या सहकाऱ्यांसह रेल्वेच्या मालधक्क्यावर खतांचा माल उतरविण्याचे काम करत होते. बोगीतील संपुर्ण माल उतरविल्याचे काम पुर्ण झाल्यानंतर त्यांची रेल्वेच्या बोगीवर चप्पल राहिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खाली उतरताना झाला घात
चप्पल राहिल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष कुमार हे बोगीवर चढले. दरम्यान खाली उतरत असताना त्यांचा रेल्वेच्या हायहोल्टेज तारेला स्पर्श झाल्याने त्यांना (Electric shock) जोरदार झटका बसला. त्यात जागेवरच संतोष कुमार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी (Railway Police) घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.