Sambhajiraje Chhatrapati : ठरलं! संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातून लोकसभेची निवडणूक लढवणार

Sambhajiraje Chhatrapati kolhapur : संभाजीराजेंनी उद्यापासून कोल्हापूर मतदारसंघाचा दौरा सुरु करणार असल्याचे जाहीर केले. यावरून संभाजीराजे छत्रपती लोकसभेला कोल्हापूरमधून रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024
sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024saam tv
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Sambhajiraje Chhatrapati Latest News :

राज्यातील राजकीय नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांकडून जागावाटपासाठी बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज पक्षामधून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याचदरम्यान त्यांनी उद्यापासून कोल्हापूर मतदारसंघाचा दौरा सुरु करणार असल्याचे जाहीर केले. यावरून संभाजीराजे छत्रपती लोकसभेला कोल्हापूरमधून रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान संभाजीराजेंनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संभाजीराजेंच्या नाशिक दौऱ्यामुळे ते या जागेवरून लोकसभा लढवणार, अशी चर्चा सुरु होती. याचदरम्यान, संभाजीराजे कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत माहिती आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024
Prakash Ambedkar: 'वंचित' महाविकास आघाडीचा भाग नाही; प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं कोणतं कारण सांगितलं?

संभाजीराजे छत्रपती लोकसभेला कोल्हापूरमधून रिंगणात उतरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाशिक की कोल्हापूर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ते उद्यापासून मतदारसंघाचा दौरा सुरू करणार आहे.

sambhajiraje chhatrapati to contest lok sabha election 2024
Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही; MVA बैठकीतून बाहेर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

संभाजीराजेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची कोंडी?

संभाजीराजे छत्रपती हे स्वत:च्या स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे बोललं आहे. महविकास आघाडीकडून घटक पक्षात प्रवेश करण्याची अट संभाजीराजेंनी अमान्य केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे महविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

संभाजीराजेंनी एफबी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वीच स्वराज्य पक्ष निवडणूक लढणार असल्याची हिंट दिली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं होतं की, 'स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com