Prakash Ambedkar, MVA, Maharashtra Politics
Prakash Ambedkar, MVA, Maharashtra Politics Saam TV

Prakash Ambedkar: 'वंचित' महाविकास आघाडीचा भाग नाही; प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं कोणतं कारण सांगितलं?

Maharashtra Political News : आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. पुढील आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होणार, असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Published on

MVA Meeting Mumbai, Maharashtra News :

महाविकास आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीतही जागावाटपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहे. आजची बैठक सकारात्मक झाली असली तरी जागावाटपावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

Prakash Ambedkar, MVA, Maharashtra Politics
Mahavikas Aghadi News : जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : 'मविआ' च्या शिष्टमंडळाची मागणी

कारण वंचित अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही, असं स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. पुढील आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होणार, असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकर अर्ध्यावर बैठकीतून बाहेर

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, बैठक अजून सुरु आहे. मला बाहेर जायचे असल्यामुळे मी बैठकीतून बाहेर निघालो आहे. जे मुद्दे मी बैठकीत ठेवले होते, त्या मुद्द्यांच्या संदर्भात तिन्ही पक्ष अंतर्गत चर्चा करत आहेत. या मुद्द्यांमध्ये आणखी काही मुद्दे सामील करायचे असल्यास ते केले जातील. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार होईल. इतर मुद्द्यांवरील चर्चा ही सुरू राहील. मला काही बाहेर कामानिमित्त जायचे आहे त्यामुळे मी निघालो आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये, याची दक्षता घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे जागावाटप हे दुसऱ्या टप्प्यात ठरवलं जाईल. त्याआधी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा होणार आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. आमचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा भाग होण्याचा विषय नाही.

Prakash Ambedkar, MVA, Maharashtra Politics
Pune Crime: पत्नीच्या नावावर कर्ज काढून मित्राला देणं जिवावर बेतलं; पैसे परत मागताच बांबूने बेदम मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com