Manoj jarange Patil: '२०० जेसीबी आमच्या घामाचे, ओबीसीमधूनच आरक्षण घेणार...' जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार!

Manoj jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या झुंड शाहीला आमचा विरोध असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. भुजबळांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Manoj jarange Patil News:

पंढरपूरमध्ये ओ.बी. सी भटके विमुक्त एल्गार महामेळावा पार पडला. या मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या झुंड शाहीला आमचा विरोध असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. भुजबळांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"दोन महिन्यात सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणात असेल. अडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कुणबी नोंदी या सरकारी आहेत. आम्ही ओबीसींमधूनच आरक्षण घेणार आहे. एकदा आरक्षण मिळू दे, सगळा हिशोब होणार.. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच बीडमधील हॉटेल यांनीच जाळले," असेही ते म्हणाले.

200 जेसीबी आमच्या घामाचे...

"समाजाच्या न्यायासाठी ही लढाई सुरू आहे. महापुरुषांच्या विचारांची भाषा कशाला करतो. 200 जेसीबी आमच्या घामाचे आहेत. आमचे लोक कष्ट करतात, तुझ्यासारखे घोटाळे करून आम्ही जेलमध्ये जात नाही. अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. त्याचबरोबर या महिन्यात 6 कोटी मराठे आरक्षणात जाणार आहेत तू फक्त वाचत बस.." असा टोलाही छगन भुजबळांना लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Bhandara News: भंडारा जिल्ह्यात पोलिसांची दादागिरी, धकाबुक्कीत वृद्ध जखमी

ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळांचा हल्लाबोल...

दरम्यान, पंढरपुरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली होती. "जेसीबीने फुले उधळतात, हेलिकॉप्टरने फुले उधळतात ते गरीब आहेत म्हणून सांगतात. आरक्षण हवं तर स्वतंत्र आरक्षण द्यावं. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही," असे छगन भुजबळ म्हणाले होते. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Sanjay Singh: आप नेते संजय सिंह तुरुंगातून बाहेर येणार, या कामासाठी मिळाली परवानगी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com