Bilkis Bano Case: बिलकिस बानो प्रकरणावर सोमवारी सुनावणी, ११ दोषींसंदर्भात सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

Bilkis Bano Case: बिलकिस बानो प्रकरणातील ११ दोंषीची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Bilkis Bano Case
Bilkis Bano CaseSaam Digital
Published On

Bilkis Bano Case

बिलकिस बानो प्रकरणातील ११ दोंषीची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून ११ जणांच्या सुटकेसंदर्भात निर्णय देण्यात येणार असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत.

गुजरातमध्ये २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीदरम्यान बिलकिस बानोच्या घरावरही हल्ला करण्यात आला होता. बिलकिस बानो ५ महिन्यांची गरोदर असतानाही तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तसेत तिच्या कुटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आली होती. तर सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या घटनेनंतर बिलकिस बानोने तिच्या मुलींसह आणि कुटुंबासह आपलं गाव सोडावं लागलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bilkis Bano Case
ISRO Set Aditya L-1: इस्रोने रचला इतिहास, आदित्य-एल1ने केला सूर्यनमस्कार, सौरऊर्जेच रहस्य उलघडणार

बिलकिस बानोवर आणि तिच्या कुटुंबावर झालेल्या हत्या प्रकरणात ११ जणांना दोषी ठरवण्यात आलं. सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला या प्रकरणाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी गुजरात सरकारने एक समिती स्थापन करून या समितीच्या शिफारसीवरून ११ दोषींनी सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याविरोधात बिलकिस बानोने सर्वोच्च न्यायालयाद धाव घेतली होती.

Bilkis Bano Case
Sanjay Singh: आप नेते संजय सिंह तुरुंगातून बाहेर येणार, या कामासाठी मिळाली परवानगी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com