Sanjay Singh: आप नेते संजय सिंह तुरुंगातून बाहेर येणार, या कामासाठी मिळाली परवानगी

Delhi News: दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांना तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे.
sanjay singh
sanjay singhSaam Digital
Published On

Sanjay Singh News:

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांना तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांना हा दिलासा मिळाला आहे.

संजय सिंह यांना पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार बनवण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या नामांकनासाठी त्यांना स्वतः उपस्थित राहावे लागेल. त्यामुळेच न्यायालयाने त्यांना तुरुंगाबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

sanjay singh
Sharad Mohol Case Update: शरद मोहोळ घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय घडलं?; पोलिसांनी सगळा घटनाक्रम सांगितला, आरोपींची हिस्ट्रीही खोदून काढली

संजय सिंह यांनी न्यायालयात दोन अर्ज दाखल केले होते. पहिल्या अर्जात संजय सिंह यांनी राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या नो-ड्यूज प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याची परवानगी मागितली होती आणि दुसऱ्या अर्जात त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची, तसेच कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची परवानगी मागितली होती.  (Latest Marathi News)

दिल्लीत राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी 19 जानेवारीला विधानसभेत मतदान होणार आहे. सध्या दिल्लीतून राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. सुशील गुप्ता, संजय सिंह आणि एनडी गुप्ता यांचा कार्यकाळ 27 जानेवारीला संपत आहे.

sanjay singh
Bharat Jodo Nyay Yatra: 'न्याय का हक मिलने तक', काँग्रेच्या भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो आणि टॅगलाईन लॉन्च

निवडणूक अधिकाऱ्यांनी 2 जानेवारीला निवडणूक घेण्याची नोटीस जाहीर केली आहे. अर्जात सिंह यांनी म्हटले आहे की, यासाठी नामनिर्देशनपत्रे 9 जानेवारीपर्यंत सादर करावयाची आहेत. अर्जात तिहार तुरुंग अधीक्षकांना सिंह यांना कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची परवानगी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सिंह यांना 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

ईडीने आरोप केला आहे की सिंह यांनी आता बंद झालेले उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे काही दारू उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना फायदा झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com