भारतीय आंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने अंतराळ संशोधनात इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेले आदित्य एल -१ यान पृथ्वीपासून १५ लाख किमीअंतरावरील कक्षेत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचलं आहे. अंतराळातील एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवरून हे यान सूर्याचं निरीक्षण करेल. लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. आता सूर्याचं तापमाण आणि कोरोना लहरींचा अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे.
इस्त्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. या मोहिमेंतर्गत २ सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य एल -१ या अंतराळ संशोधन यानाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. जवळपास चार महिन्यांचा प्रवास करत हे यान एल -१ पॉईंटवर पोहाचंल आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आज लॅग्रेंज पॉइंटच्या हॅलो ऑर्बिटमध्ये त्याला स्थिर करण्यात यश मिळवलं आहे. इस्त्रो आणि भारताचं हे मोठं यश मानल जात आहे. इस्त्रो सातत्याने अंतराळ मोहिमा यशस्वी करत आहे. चांद्रयान मोहीम ही यशस्वी ठरली होती. या सौर मोहिमेतून सूर्याची आणि विश्वाची निर्मिती कशी झाली याचा उलघडा होण्यास मदत होणार आहे. इस्त्रोच्या पुढच्या मोहिमांसीठी ही मोहीम यशस्वी होणं अत्यंत महत्त्वाचं होतं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.