Maharashtra : पश्चिम महाराष्ट्र - कोकण फक्त १ तासात, या द्रुतगती महामार्गाच्या काम वेगात

Ratnagiri Jaigad–Chiplun–Satara Expressway : जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी NHAI कडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ९८ किमी लांबीच्या या महामार्गामुळे जयगड आणि सातारातील प्रवासाचा वेळ पाच तासांवरून एका तासावर येण्याची शक्यता आहे.
JAIGAD CHIPLUN SATARA EXPRESSWAY PROJECT: NHAI BEGINS WORK TO CONNECT JAIGAD PORT WITH WESTERN MAHARASHTRA
JAIGAD CHIPLUN SATARA EXPRESSWAY PROJECT: NHAI BEGINS WORK TO CONNECT JAIGAD PORT WITH WESTERN MAHARASHTRASaam tv
Published On
Summary
  • जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाच्या कामांना वेग

  • महामार्गाची लांबी सुमारे ९८ किलोमीटर असेल

  • सातारा ते जयगड प्रवासाचा वेळ पाच तासांवरून अवघ्या एका तासावर येणार

  • उद्योग, व्यापार आणि मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार

रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या प्रकल्पाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या महामार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क अधिक मजबूत होणार असून उद्योग, व्यापार आणि वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रस्तावित द्रुतगती महामार्गाची लांबी सुमारे ९८ किलोमीटर असेल. हा महामार्ग जयगड बंदरातून सुरू होऊन चिपळूणमार्गे सातारा जिल्ह्यापर्यंत जाणार आहे. पुढे तो कराडजवळील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना जयगड बंदराशी थेट उपलब्ध होईल.

JAIGAD CHIPLUN SATARA EXPRESSWAY PROJECT: NHAI BEGINS WORK TO CONNECT JAIGAD PORT WITH WESTERN MAHARASHTRA
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

सध्या सातारा ते जयगड हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच तासांचा कालावधी लागतो. मात्र, द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण करता येणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच मालवाहतुकीचाही खर्च कमी होईल.

JAIGAD CHIPLUN SATARA EXPRESSWAY PROJECT: NHAI BEGINS WORK TO CONNECT JAIGAD PORT WITH WESTERN MAHARASHTRA
New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

जयगड बंदर हे कोकणातील महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र मानले जाते. या बंदराच्या माध्यमातून होणारी आयात-निर्यात अधिक सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com