Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

Vande Bharat Express : महाराष्ट्राला बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी केएसआर बेंगळूरू रेल्वे स्थानकावरून एकाच वेळी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा सिग्नल देण्यात येणार आहे.
Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर
Vande Bharat ExpressSaam Tv
Published On
Summary
  • अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा १० ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार

  • केएसआर बेंगळूरू रेल्वे स्थानकावरून एकाच वेळी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा सिग्नल मिळणार

  • ८८१ किलोमीटरचा प्रवास करणारी महाराष्ट्रातील सर्वात लांब वंदे भारत गाडी

  • आठवड्यात सहा दिवस सेवा, एक दिवस देखभाल व तपासणीसाठी राखीव

  • प्रवासात २ ते ३ तासांची बचत, व्यापारी, विद्यार्थी, पर्यटकांसाठी मोठा फायदा

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट २०२५ रोजी देशातील आधुनिक रेल्वे प्रवासाला नवा वेग देणार आहेत. ते केएसआर बेंगळूरू रेल्वे स्थानकावरून एकाच वेळी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात अजनी (नागपूर)–पुणे वंदे भारत, केएसआर बेंगळूरू–बेळगावी वंदे भारत आणि श्री माता वैष्णोदेवी कटडा–अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक अंतर धावणारी वंदे भारत गाडी ठरणार आहे. ती एकूण ८८१ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल आणि सरासरी वेग ताशी ७३ किलोमीटर असेल. या मार्गावर सध्या धावणाऱ्या गाड्यांमध्ये ती सर्वात वेगवान गाडी असेल. या गाडीत एकूण दहा थांबे असतील आणि ती वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, पुणतांबा आणि दौंड मार्गे पुणेपर्यंत प्रवास करेल. गाडीला २६१०१/२६१०२ हा क्रमांक देण्यात आला असून, पुण्याहून नियमित सेवा ११ ऑगस्टपासून तर अजनीहून १२ ऑगस्टपासून सुरू होईल. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावेल, तर एक दिवस देखभाल आणि तपासणीसाठी राखीव असेल. तसेच वर्धा–अकोला– शेगाव– भुसावळ– जळगाव– मनमाड आणि पुणतांबा ते दौंड दरम्यानच्या भागात धावणारी पहिली वंदे भारत ट्रेन ठरणार आहे.

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर
Vande Bharat : परभणी, नांदेडला मिळाली वंदे भारत एक्सप्रेस, मुंबईहून कधी सुटणार, तिकिट किती?

या गाडीमुळे प्रवाशांना वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होईल. व्यापारी, विद्यार्थी, नोकरी करणारे कर्मचारी, तसेच पर्यटक या सर्वांना याचा लाभ होणार आहे. तसेच नागपूर-पुणे मार्ग हा विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या गाडीच्या सुरुवातीने केवळ प्रवाशांच्या सोयीसुविधाच वाढणार नाहीत, तर पर्यटन, व्यापार आणि वाणिज्यालाही चालना मिळेल. पुणे आणि नागपूर दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, उत्पादन उद्योगातील व्यावसायिक तसेच शासकीय अधिकारी यांची सततची ये-जा असते. त्यांना जलद आणि विश्वासार्ह प्रवासाची ही नवी सोय मिळणार आहे.

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचे जुने नाव काय आहे?

या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ती अधिक सुरक्षित, कमी आवाजाची आणि पर्यावरणपूरक आहे. स्वयंचलित दरवाजे, रोटेशन सीट्स, वायफाय सुविधा, माहिती फलक, बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स आणि अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम यांसारख्या सुविधा यात असतील. तसेच, या गाडीची एरोडायनॅमिक रचना तिचा वेग वाढविण्यास आणि इंधन कार्यक्षमतेस मदत करते. प्रवासादरम्यान प्रवाशांना उच्च प्रतीचे खाद्यपदार्थ आणि पेयसेवांची सोय देखील उपलब्ध होणार आहे.

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर
Vande Bharat Express : पुण्यातून धावणार आणखी एक वंदे भारत, रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल, वाचा सविस्तर

भारतातील इतर मार्गांवर आधीच सुरू असलेल्या वंदे भारत गाड्यांना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील ही नवी गाडी त्या यशस्वी परंपरेला पुढे नेईल, अशी अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की, या गाडीच्या सुरूवातीने नागपूर-पुणे प्रवासाच्या वेळेत तब्बल २ ते ३ तासांची बचत होईल, जे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर
Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू, 'या' दिवशी धावणार; थांबा कुठे?

नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात पार पडणार असून या सोहळ्याला रेल्वे मंत्री, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तसेच नागपूर आणि पुणेतील लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. उद्घाटनाच्या दिवशी गाडीला विशेष सजावट करण्यात येणार आहे आणि प्रवाशांसाठी स्वागत सोहळ्याचे आयोजन होणार आहे. या नव्या रेल्वेसेवेच्या सुरुवातीने महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला नवे बळ मिळणार असून राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होतील.

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर
Nagpur Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारतचे वेळापत्रक आले, ९ स्थानकावर थांबणार, कोणकोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची यादी

  • नागपूर-सिकंदराबाद

  • हुबळी-पुणे

  • कोल्हापुर–पुणे

  • जालना–छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस

  • बिलासपूर-नागपूर

  • मुंबई सेंट्रल-गांधीनगर

  • इंदूर-नागपूर

  • सीएसएमटी-साईनगर शिर्डी

  • सीएसएमटी-सोलापूर

  • सीएसएमटी-मडगाव

  • मुंबई सेंट्रल-अहमदाबाद

  • अजनी (नागपूर)-पुणे (नवीन सेवा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com