Sakshi Sunil Jadhav
Train 18’ हे नाव या गाडीच्या निर्मितीच्या वर्षावरून ठेवले गेले होते. ही ट्रेन 2018 साली बनवण्यात आली, म्हणून तिचं नाव "ट्रेन 18" असं ठेवलं गेलं.
ट्रेन 18 ही पूर्णपणे भारतीय बनावटीची (Make in India) ट्रेन आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे ही ट्रेन तयार करण्यात आली.
ट्रेन 18 चा पहिला प्रवास नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाला.
सेमी-हायस्पीड ट्रेन, इंजिनलेस डिझाईन, वातानुकूलित डब्बे, स्वयंचलित दरवाजे, GPS आधारित सूचना प्रणाली या सुविधा आहेत.
ट्रेन 18 चं अधिकृत नाव "वंदे भारत एक्सप्रेस" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये घोषित केलं.
"वंदे भारत एक्सप्रेस" हे नाव भारताच्या आत्मनिर्भर आणि प्रगत रेल्वे तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे.
आज वंदे भारत एक्सप्रेस ही भारतभर अनेक मार्गांवर धावतेय आणि तिच्या नवीन व्हर्जन्समध्ये वंदे भारत 2.0 देखील उपलब्ध आहे.