Sakshi Sunil Jadhav
हातगड किल्याचा गौरवशाली इतिहास आणि पर्यटनाची माहिती पुढे अगदी कमी वेळात जाणून घ्या.
हातगड किल्ला हा नाशिकपासून सुमारे ७० किमी अंतरावर आहे.
हातगड किल्ला हा सपुतारा जवळ, बागलाण तालुक्यात आणि महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर वसलेला किल्ला आहे.
तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी या किल्ल्याला भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद लुटू शकता.
नाशिकहून वणीमार्गे किंवा त्र्यंबकेश्वरमार्ग हातगड फाट्यापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला तिथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळेल.
तुम्हाला इथे फक्त ४५ मिनिटांत हा किल्ला पायी गाठता येऊ शकतो. तिथे तुम्ही सपुतारा शहराचे विहंगम दृश्य पाहू शकता.
किल्ल्यावर तुम्ही संपूर्ण परिसरातले दाट जंगल, निसर्गसौंदर्य आणि थंड गार वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. पुढे तुम्ही जवळच असलेले सपुतारा, वनस्पती उद्यान रोपवे आणि गिरणा नदीचे दृश्य पाहू शकता.
पावसाळ्यात तुम्ही योग्य चपला, रेनकोट, पाण्याची बाटली, मोबाईल कव्हरसोबत ठेवणे गरजेचे आहे.
NEXT : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य