Kalim Qureshi: इम्तियाज जलील हल्ला प्रकरणात ज्याचं नाव आलं तो कलीम कुरेशी कोण?

Imtiyaz Jaleel Attack Row: संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. या हल्याप्रकरणात कलीम कुरेशी यांचे नाव पुढे येत आहे. इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद झाल्यानंतर कलीम कुरेशीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Imtiyaz Jaleel Attack Row
Imtiyaz Jaleel attack controversy intensifies as Kalim Qureshi’s name surfaces; tension rises in Sambhajinagar politics.saam tv
Published On
Summary
  • इम्तियाज जलील हल्ला प्रकरण राजकीय वादाच्या केंद्रस्थानी

  • कलीम कुरेशी यांचं नाव समोर आल्यानं वाद अधिक चिघळला

  • भाजप-शिवसेना समर्थकांवर जलील यांचे आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला असून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झालाय. हल्लेखोरांना भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा आहे. संजय शिरसाट आणि अतुल सावे यांचे कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला असा, आरोप इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केला. दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्यामागे कलीम कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कलमी कुरेशी कोण? हे जाणून घेऊ.

Imtiyaz Jaleel Attack Row
Imtiyaz Jaleel Attack: माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला का झाला? रॅलीत नेमकं काय घडलं? Video

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची वैजापूर येथे रॅली होती. प्रचार रॅली सुरू होतानाच बायजीपूरा भागात एका गटाने त्यांच्यावर हल्ला केला. जलील यांच्या कारला घेराव घालत हल्ला केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत एक कार्यकर्ता जखमी झाला. इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपूरा परिसरातून जात असताना सुरुवातीला काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले यावेळी माजी खासदार जलील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला.

त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रॅली पुढे गेली, पण रॅली संपताच अचानक काही तरुण जलील यांच्या गाडीच्या दिशेने धावले, यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान या हल्ल्यामागे कलीम कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप केला जातोय.

Imtiyaz Jaleel Attack Row
Sambhajinagar : मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण, संभाजीनगरचे वातावरण तापले

कोण आहे कलीम कुरेशी?

कलीम कुरेशी हे एकाच वेळी प्रभाग ९ मधून वंचित पक्षाकडून तर प्रभाग १४ मधून काँग्रेसमधून निवडणुकीसाठी उभे आहेत. कलीम कुरेशी आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये जुना वाद आहे अशी माहिती दिली. त्यामुळेच कलीम कुरेशीने एमआयएमची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. कलीम कुरेशी हे छत्रपती संभाजीनगरमधील माजी नगरसेवक आहेत. ते मोठ्या प्रमाणात असलेल्या खाटीक समाजाचे तो नेतृत्व करतात. याआधी ते एमआयएममध्ये होते. पण इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद झाल्यानंतर कलीम कुरेशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com