Sambhajinagar : मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण, संभाजीनगरचे वातावरण तापले

AIMIM workers clash in Chhatrapati Sambhajinagar : महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर संभाजीनगरमध्ये नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत वाद चिघळल्याचे चित्र आहे.
Imtiaz Jaleel attacked during municipal election campaign
Imtiaz Jaleel attacked during municipal election campaign Saam TV Marathi
Published On

Imtiaz Jaleel attacked during municipal election campaign : महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलाय. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमध्ये मारहाण झाली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची कार रोखली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कारवर धडाधड बुक्या अन् पायांनी मारहाण केली. त्याशिवाय जलील यांनाही मारहाण केली. या प्रकारानंतर संभाजनगरमधील वातावारण चांगलेच तापलेय.

Imtiaz Jaleel attacked during municipal election campaign
Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

इम्तियाज जलील यांना मारहाण -

छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुऱ्यात जलील यांना मारहाण झाली. एमआयएमचे कार्यकर्ते आणि एमआयएमचे नाराज कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा आणि हाणामारी झाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज झालेली हे त्या भागातून पदयात्रा काढत होते. पदयात्रा सुरू झाल्यानंतर त्यांना विरोध होत होता. जलील त्यांच्यासमोरच हा राडा झाला. जलील यांना आधी काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर आडवले अन् हाणामारी झाली. यावेळी दोन गटांमध्ये हमारीतुमरी होऊन हाणामारी झाली. त्यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला.

Imtiaz Jaleel attacked during municipal election campaign
BJP AIMIM alliance : राज्याच्या राजकारणात ट्विस्ट, भाजपनं केली एमआयएमशी युती, ठाकरेंनाही घेतलं सोबत, वाचा नेमकं काय घडलं

तिकिट नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष वाढला -

2014 पासून मराठवाड्यात पाय रोवणाऱ्या, मुस्लिम बहुल भागात वर्चस्व असणाऱ्या आणि मुस्लिम बहुल भागामध्ये एकतर्फी विजय मिळवणाऱ्या एमआयएमला छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम बहुल भागातच विरोध होऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा भागांमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पदयात्रा काढताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांना पदयात्रा वळवून दुसऱ्या गल्लीत घेऊन जावी लागली. त्यानंतरही काळे झेंडे दाखवणारे आणि विरोध करणारे लोक त्यांच्या मागे काळे झेंडे घेऊन फिरत होते. ज्यांनी दहा-बारा वर्ष एमआयएम साठी काम केलं, त्यांना तिकीट दिले नाही म्हणून लोक विरोध करीत असल्याची प्रतिक्रिया बंडखोरी केलेल्या आणि काँग्रेसमधून पुरस्कृत उमेदवाराचे म्हणणे आहे. तर इम्तियाज जलील यांनी सोळा तारखेला हा विरोध कळेल अशी प्रतिक्रिया दिलीय.

Imtiaz Jaleel attacked during municipal election campaign
MMRDA : नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली फक्त १५ मिनिटांत, प्रोजेक्टचं ८० टक्के काम पूर्ण, कधी सुरू होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com