Imtiyaz Jaleel Attack: माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला का झाला? रॅलीत नेमकं काय घडलं? Video

Former MP Imtiyaz Jaleel Attack : वैजापूरमधील एका रॅलीदरम्यान माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर संतप्त समर्थकांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीला घेराव घालत हल्ला केला. यामुळे संभाजीनगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. नेमके काय घडले आणि हल्ला का झाला ते जाणून घ्या.
Summary
  • वैजापूर रॅलीदरम्यान इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला

  • नाराज कार्यकर्त्यांनी कारला चहुबाजूंनी घेरलं

  • घटनेनंतर संभाजीनगरात तणाव निर्माण

वैजापूरमध्ये रॅलीला सुरुवात करत असतानाच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची कार अडवत त्यांच्यावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी जलील यांच्या कारला चहुबाजूने घेरलं. या घटनेनंतर संभाजनगरमधील वातावारण चांगलेच तापलंय. दरम्यान माजी खासदार इम्तियाज यांच्यावर हल्ला का झाला याची माहिती स्थानिकांनी दिलीय.

एमआयएमचे कार्यकर्ते रॅलीसाठी आले त्यांनी आम्हाला पाहून चुकीच्या कमेंट्स केल्या. त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं. त्यांच्याकडे फायटर होते. दांडुके होते, त्याच्या साहाय्याने त्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. यावेळी त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैसे घेण्याचा आरोप लावला. इतकेच नाही तर लोकांनी एमआयएमवर आरोप केला. २० वर्षापूर्वी आलेल्या या पक्षाने जातीवाद सुरू केला. मुसलमान मुसलमाचा शत्रू झाल्याचा आरोप काही लोकांनी केला. दरम्यान मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, दोन शिवसेना, भाजप आणि एमआयएम पक्ष येथे ताकदीने निवडणूक लढवत आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीही मैदानात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com