

मान्सून माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा जाणवण्याची शक्यता
मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
९ ऑक्टोबरपासून उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातून मान्सून माघारी परतल्यानंतर भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा पहिला इशारा दिलाय. पुढील काही दिवसांत अनेक भागांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने किनारपट्टीवरील महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिलाय. पुढील काही दिवसांत कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून राज्यातील चार जिल्ह्यांना 9 ऑक्टोबरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. या काळात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
हवामान विभागाकडून 10 ऑक्टोबरला देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या 10 ऑक्टोबरला तीन जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामध्ये ठाणे, रागड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरीत उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीवरील जिल्हे वगळता इतर राज्यांमध्ये कोरडे वातावरण राहणार आहे. मात्र तापमानात वाढ झाली असेल. सर्व जिल्ह्यांमध्ये कडाक्याचे ऊन पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी तापमानात वाढ होते. पण यंदा ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.