

मान्सून परतीच्या काळात १४ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट
हवामान विभागाचा वादळासह मुसळधार पावसाचा इशारा
बिहार केरळ तामिळनाडू कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा
उत्तर भारतासह संपूर्ण देशातून मान्सून माघार घेतोय. पुढील तीन ते चार दिवसांत तो पूर्व भारतातूनही माघार घेण्याची शक्यता आहे. पण याचदरम्यान उद्या शुक्रवार, ९ ऑक्टोबरसाठी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्यानुसार, उद्या बिहार, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
वायव्य भारताचा विचार करता, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासह उद्या शुक्रवारी हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थानमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगमध्येही पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय. पूर्व मध्य प्रदेशात ५० प्रतिकिलो वेगाने सोसाट्याचा वारे वाहतील. दरम्यान, पूर्व भारताचा विचार करता, हवामान विभागाने अंदमान आणि निकोबार बेटे, तसेच पश्चिम बंगालची मैदानी क्षेत्रे, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बिहारमध्ये उद्या वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देणारा सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आलाय.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर,मिझोराम, त्रिपुरामध्येही पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरासाठी वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. यासह आंध्र प्रदेशचा किनारी भाग, यानम, कर्नाटकचा किनारी भाग, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथेही पाऊस होईल अशी शक्यता आहे.
केरळ आणि माहेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातही वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.