Igatpuri : साईबाबांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना! मुक्कामाच्या ठिकाणी निवारा शेड कोसळले, १७ साईभक्त जखमी

Maharashtra Igatpuri Incident News : शिर्डीच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन निघालेल्या वाशिंदच्या साईभक्तांच्या मुक्कामाच्या ठिकाणी इगतपुरीत निवारा शेड कोसळले. या दुर्घटनेत चार महिलांसह १७ जण जखमी झाले आहे.
Maharashtra Shirdi Sai baba News
Maharashtra Shirdi Sai baba News AI image
Published On: 

फैय्याज शेख, शहापूर

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या साईभक्तांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अचानक निवारा शेड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १७ साईभक्त जखमी झाले असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील साईभक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी पालखी घेऊन शिर्डीच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान त्यांचा दुसरा मुक्काम इगतपुरी येथील साईभक्त निवासात आयोजित करण्यात आला होता. दिवसभराचा पायी प्रवास पूर्ण करून सर्व भक्त रात्री निवासाच्या ठिकाणी पोहोचले होते.

Maharashtra Shirdi Sai baba News
Plane Crash : हवेतच विमानाला आग, क्षणांत जमिनीवर कोसळून मोठा स्फोट; विमान दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर काही साईभक्त आराम करत होते, तर काहीजण झोपण्याच्या तयारीत होते. अशातच अचानक निवारा शेड कोसळून तेथे उपस्थित असलेल्या भक्तांवर पडले. या अनपेक्षित घटनेमुळे झोपण्याच्या तयारीत असलेल्या भक्तांमध्ये मोठी धावपळ उडाली. शेडच्या खाली अडकलेल्या आणि जखमी झालेल्या भक्तांना बाहेर काढण्यात आले.

Maharashtra Shirdi Sai baba News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुन्हा ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात; १५०० रुपये कधी मिळणार?

या दुर्घटनेत एकूण १७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन भक्तांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर तीन जणांना फ्रॅक्चर झाले आहे. उर्वरित दहा जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, जखमी झालेले सर्व साईभक्त हे शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील रहिवासी आहेत. दरवर्षी श्रद्धेने आणि भक्तिभावाने पायी पालखी घेऊन शिर्डीला जाण्याची परंपरा ते जपत आहेत. मात्र, यंदाच्या यात्रेदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.