Ladki Bahin Yojana : 'योजना हवी असेल तर आमचं बटण दाबा', लाडक्या बहीणींना अजितदादांची साद

Ajit Pawar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana : आता बातमी सरकारी योजनांवरुन सुरु असलेल्या टोलेबाजीची. सरकारी योजना सुरु ठेवायच्या असतील तर अजित पवारांनी मतदारांना थेट आवाहन केलंय.
'योजना हवी असेल तर आमचं बटण दाबा', लाडक्या बहीणींना अजितदादांची साद
Ajit Pawar on Mukhyamantri Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीतली अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केलीय. राज्यव्यापी जन सन्मान मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये नवी चेतना भरण्याचा प्रयत्न अजितदादांचा आहे. त्यासाठी अजितदादांनी लाडकी बहीण योजनेचं कार्ड बाहेर काढलंय. त्यासाठी दादांनी पिंक पॉलिटिक्सची रणनीती आखलीय.

अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर आता जाहीर सभेत दादांनी लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल आमच्या नावाची बटणं दाबा अशी महिलांना साद घातलीय. तर ही योजना योग्य पद्धतीनं सुरू ठेवण्यासाठी मविआची गरज असल्याचा सांगत जयंत पाटलांनी अजितदादांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की, ''योजनांसाठी आम्हाला मतदान करा.''

'योजना हवी असेल तर आमचं बटण दाबा', लाडक्या बहीणींना अजितदादांची साद
Maharashtra Politics 2024 : दिल्लीवारीनंतर ठाकरे गटाची सीएमपदावरून माघार? मविआत मुख्यमंत्रिपदावरून मतभेद?

राज्यात लोकसभा निवडणुकांवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या प्रचारसभेत, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, मात्र आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटणं दाबा, असं विधान केलं होतं. मात्र तरीही त्याचा दादांना लाभ झाला नव्हता. मात्र या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला होता.

'योजना हवी असेल तर आमचं बटण दाबा', लाडक्या बहीणींना अजितदादांची साद
Rajya Sabha Clash: 'तुमचा टोन बरोबर नाहीये...', जया बच्चन यांचं वक्तव्य; जगदीप धनखड संतापले; पाहा VIDEO

आता पुन्हा विधानसभेच्या तोंडावर दादांनी योजना हव्या असल्यास बटणं दाबण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे लाकडी बहीण कुणाच्या नावासमोरचं बटण दाबणार आणि कुणाला सत्येबाहेर ठेवणार याचीच उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com