Rajya Sabha Clash: 'तुमचा टोन बरोबर नाहीये...', जया बच्चन यांचं वक्तव्य; जगदीप धनखड संतापले; पाहा VIDEO

Jaya Bachchan and Jagdeep Dhankhar: राज्यसभेच्या कामकाजादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला. यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ जाहल्याच पाहायला मिळालं.
'तुमचा टोन बरोबर नाहीये...', जया बच्चन यांचं वक्तव्य; जगदीप धनखड संतापले; पाहा VIDEO
Jaya Bachchan and Jagdeep DhankharSaam Tv
Published On

संसदेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला. जया बच्चन म्हणाल्या की, मी एक कलाकार आहे. मला देहबोली समजते, चेहऱ्यावरील हावभाव ओळखता येतात. त्या म्हणाल्या की, मला माफ करा पण तुमचा बरोबर नाहीये.

जया बच्चन असलं म्हणाल्या नंतर राज्यसभा सभापती जगदीप धनखड संतापले. यानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला आणि विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी विरोधी सदस्यांनी 'दादागिरी चालणार नाही' अशा घोषणा दिल्या. दरम्यान, सभागृह नेते जेपी नड्डा यांनी विरोधी पक्षांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणला.

'तुमचा टोन बरोबर नाहीये...', जया बच्चन यांचं वक्तव्य; जगदीप धनखड संतापले; पाहा VIDEO
Jagdeep Dhankhar : ओरडण्याची हिंमत कशी झाली? पुढच्यावेळी बाहेरचा रस्ता दाखवेन; राज्यसभेचे सभापती धनखड यांचा खासदाराला इशारा

जया बच्चन यांच्यावर संतापून जगदीप धनखड म्हणाले की, ''तुम्ही खूप मोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत, तुम्हाला माहित आहे की, अभिनेता हा दिग्दर्शकाचा विषय असतो. तुम्ही माझ्या टोनवर शंका घेत आहात. हे आपण खपवून घेणार नाही. तुम्ही सेलिब्रिटी आहात.'' यावर विरोधी पक्षांकडून सांगण्यात आले की, त्या संसदेच्या ज्येष्ठ सदस्या आहेत, त्यांना तुम्ही सेलिब्रिटी कसे म्हणू शकता.

यावर सभापती धनखड म्हणाले की, ज्येष्ठ सदस्य सभापतींचा अवमान करत आहेत. माझ्याकडे माझी स्क्रिप्ट आहे. विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहातून सभात्याग केला. या गोंधळावर धनखड म्हणाले की, विरोधी पक्षांना चर्चेत भाग घ्यायचा नाही आहे. ते आपलं कर्तव्य पार न पाडता सभागृहातून बाहेर पडत आहे.

'तुमचा टोन बरोबर नाहीये...', जया बच्चन यांचं वक्तव्य; जगदीप धनखड संतापले; पाहा VIDEO
Leo Polymer Technology: राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी 'लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी'चा वापर होणार, काय आहे हे तंत्रज्ञान?

दरम्यान, 9 ऑगस्ट 1942 च्या भारत छोडो आंदोलनाचा संदर्भ देत जगदीप धनखड म्हणाले की, आज त्यांनी संसद सोडली. जग आपल्याला ओळखत आहे. जनता विकास पाहत आहे. आपण विकासाच्या प्रवासात आहोत. मी पूर्ण जबाबदारीने या व्यासपीठाचा वापर करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com