Husband Killed Wife: भल्यापहाटे झोपेतच पत्नीला संपवलं; मग स्वत:ही घेतला गळफास; तरुणाच्या कृत्याने नाशिक हादरलं

Husband Killed Wife in Nashik: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने भल्यापहाटे पत्नीची झोपेतच निर्घृणपणे हत्या केली.
Husband killed Wife and ended her life journey nashik latest crime news
Husband killed Wife and ended her life journey nashik latest crime newsSaam TV
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही

Husband Killed Wife in Nashik

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची झोपेतच निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतही स्वत: देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी (१३ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छानगरमध्ये ही घटना घडली. विशाल निवृत्ती घोरपडे आणि प्रीती विशाल घोरपडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. (Latest Marathi News)

Husband killed Wife and ended her life journey nashik latest crime news
Nagpur Crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले; धमकी देत खंडणी मागितली, तणावातून तरुणाने संपवलं जीवन

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. विशालने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. पतीने पत्नीची हत्या करुन स्वत: ही गळफास घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विशाल घोरपडे पत्नी प्रीती घोरपडे हिच्यासह नाशिक शहरातील (Nashik News) आडगाव परिसरातल्या इच्छामनीनगर येथे राहत होता. मंगळवारी रात्री काही कारणावरुन त्यांचा वाद झाला होता. दरम्यान, प्रीती गाढ झोपेत असताना विशालने बुधवारी पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली.

प्रीती झोपेत असताना विशालने घरातील मुसळीने तिच्या डोक्यात सपासप वार केले. या घटनेत प्रीतीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर विशालने घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, या शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Husband killed Wife and ended her life journey nashik latest crime news
Uttar Pradesh Crime News: घरी सोडण्याच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; उत्तर प्रदेशात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com