SSC HSC Exam Date : सोशल मीडियावर अफवांचा बाजार, SSC-HSC वेळापत्रकासंदर्भात बोर्डानं दिली महत्वाची माहिती

SSC And HSC Board Calrification: सध्या सोशल मीडियावर १०वी आणि १२वीच्या परिक्षांचे वेळापत्रक व्हायरल होत आहे. मात्र, या अफवा असल्याचे राज्य महामंडळाने सांगितले आहे.
SSC HSC Exam Date
SSC HSC Exam DateSaam Tv
Published On

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखाबाबत अफवा पसरवल्या जात आहे. दहावी बारावीच्या परिक्षांच्या तारखांबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दहावी बारावीच्या परिक्षांबाबत पसरवल्या जाणाऱ्या या मेसेजबाबत आता स्वतः राज्य मंडळांने अधिकृतपणे खुलासा केला आहे. त्यांनी अधिकृत प्रकटन प्रसिद्ध करुन खुलासा जाहीर केला आहे. (SSC And HSC Exam Dates)

SSC HSC Exam Date
Maharashtra Weather: सावधान! कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार, IMD कडून या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज

राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये नऊ विभागीय मंडळामार्फेत १०वी आणि १२वीची परीक्षा घेण्यात येते. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र लेखी परिक्षांच्या संभाव्य तारखांबाबत सूचना, हरकती मागवण्यात आल्या होत्या. दरम्यान काही वेबसाइटवरुन फेब्रुवारी- मार्च महिन्यात आयोजित केलेल्या परिक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर पसरत आहे.

दरम्यान, राज्य मंडळाने अधिकृत संकेतस्थळावर अशी कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले जात आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी)लेखी परिक्षेची वेळापत्रके ग्राह्य धरु नये, असं म्हटलं आहे. (HSC And HSC Exam Fake Dates)

SSC HSC Exam Date
Accident News: मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची जोरदार धडक

दरम्यान फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परिक्षांची वेळापत्रके www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येतील. त्यामुळे या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा.

SSC HSC Exam Date
Maharashtra Assembly Election 2024 : तिसरी आघाडी, काम बिघाडी; विधानसभा निवडणुकीत कोणाची मते खाणार? पाहा व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com