Maharashtra Weather: सावधान! कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार, IMD कडून या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज

Maharashtra Rain News Weather Update: आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्टही जारी केला आहे.
Maharashtra Weather: सावधान! कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार, IMD कडून या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असतानाच राज्यातील विविध भागात पावसाच्याही जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याचे दिसत आहे. अशातच आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्टही जारी केला आहे.

Maharashtra Weather: सावधान! कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार, IMD कडून या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज
Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; शिवसेना भवनातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

देशातून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी निरोप घेतला असला तरी राज्यात मात्र वादळी पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसत आहेत. आज (गुरुवार, ता. १७) कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसासह उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर वादळी वारे, विजांसह, पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर येथे जोरदार वादळी पावसाचा इशारा आहे. दुसरीकडे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Weather: सावधान! कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार, IMD कडून या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज
Pune Crime : पुण्यात महिला सुरक्षित नाहीत का? ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार, पुण्यातील संतप्त घटना

दरम्यान, कालही राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. काल सायंकाळपासून पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. पुण्यामध्ये सायंकाळच्या सुमारास कोसळलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणातही मुसळधार पाऊस कोसळला. कोकणात कोसळलेल्या पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

Maharashtra Weather: सावधान! कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार, IMD कडून या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज
Sharad Pawar : शरद पवार यांच्या गटाची पहिली उमेदवार यादी तयार, कोणाची लागणार वर्णी ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com