बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर सुपरवायझरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पिडीत महिला हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपींगचे काम करते. याबाबत महिलेने सुरुवातीला हॉस्पिटलच्या सिक्युरीटी मॅनेजरकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलं नाही. यानंतर पुढे या महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय.४२, रा. तळेगाव दाभाडे पिंपरी-चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. बेनगुडे हा देखील हाउसकिपिंग सुपरवाझर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम (Physically assaulted) करतो. याबाबत २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिलीय. हा प्रकार जून २०२४ रोजी ज्युपिटर हॉस्पिटलमधील रेडीएशन डिपार्टमेंटच्या चेंजीग रुममध्ये घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात ज्युपिटर हॉस्पिटल आहे. तेथे तक्रारदार महिला एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून हाउसकिपिंगचे काम करते. तर आरोपी बेनगुडे हा सुपरवाझरचे काम (Pune Crime) करतो. तक्रारदार महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहते. मागील चार वर्षापासून त्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काम करते. २९ जून रोजी ती नेहमीप्रमाणे कामावर आली होती. कामाची वेळ संपल्यानंतर हॉस्पिटल्या तिसर्या मजल्यावर खाली आली होती.
या दिवशी त्यांना दुपारची शिफ्ट करण्यास सांगण्यात आले होते. तिला आरोपी बेनगुडे खाली भेटला. त्याने फिर्यादी महिलेला सांगितलं की, रेडीएशन विभागात धुळ तशीच आहे. ती जावून साफ कर. त्यानुसार फिर्यादी रेडीएशन ओन्कोलॉजी विभागात काम करण्यासाठी गेली होती.
सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी बेनगुडे तेथे आला. त्याने विभागाचा दरवाजा बंद केला. यानंतर तक्रारदार महिलेला जबरदस्तीने चेंजिंगरुमध्ये ढकलले. पीडितेने आरोपीला विरोध केला. मात्र बेनगुडे याने बलात्कार (Jupiter hospital) केला. झालेल्या प्रकारामुळे पीडित महिला घाबरून रडू लागली. त्यावेळी बेनगुडे याने याबाबत कोणाला काही सांगितलं, तर तुला कामावर राहू देणार नाही अशी धमकी दिली. यामुळे पीडित महिला घाबरून घरी निघून गेली होती.
दरम्यान पीडित महिलेवर कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे तिने याबाबत कोठेही वाच्यता केली नव्हती. काही दिवसानंतर तिने ज्युपिटर हॉस्पिटलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडे तक्रार केली. त्यांनी तक्रार अर्ज देखील (Pune Breaking News) घेतला. मात्र पुढे काही झाले नाही, असं फिर्यादी महिलेनं म्हटलंय. त्यानंतर त्यांनी चतुःश्रृंगी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी सुपरवाझर बेनगुडे याला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.