Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

Hingoli Car Accident: हिंगोलीमध्ये भीषण कार अपघात झाला. या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला.
Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू
Hingoli Car AccidentSaam Tv
Published On
  • हिंगोलीमध्ये भीषण रस्ते अपघात

  • खड्ड्यामुळे कार उलटून दोन तरुणांचा मृत्यू

  • हिंगोली-परभणी मार्गावर घडली घटना

  • अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी

संदीप नागरे, हिंगोली

हिंगोलीमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. राज्य मार्गावर खड्ड्यामुळे कार उलटली. हा अपघात इतका भीषण होता की दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर परभणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खड्ड्यामुळे दोघांचा बळी गेल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या अपघाताचा तपास सध्या हिंगोली पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये राज्य मार्गावरील खड्ड्यामुळे २ तरुणांचा बळी गेला. हिंगोली -परभणी मार्गावरील करंजाळा पाटीजवळ ही अपघाताची घटना घडली. भरधाव कार खड्ड्यात आदळून उलटली. या अपघातात औंढा तालुक्यातील गोळेगाव येथील २७ वर्षांचा ओमकार गिरे आणि राजापूर येथील ३३ वर्षांचा श्रीधर ढेगळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर किशोर खरात नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू
Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, भरधाव कार तलावात कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले हे तिघेही जण दैनंदिन कामकाज आटोपून परभणी येथून परतीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यात त्यांच्या कारचे टायर आदळल्याने कार ३ वेळा रस्त्यावर उलटली आणि हे तिघेही जण कारच्या बाहेर फेकले गेले. त्यामुळे तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचा मृत्यू झाला. एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू
Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोघांचा बळी गेला आहे. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य राबवत या दोन्ही तरुणांचे मृतदेह औंढा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवले. तर जखमी तरुणाला परभणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com