Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Jaisalmer SUV Accident : राजस्थानातील जैसलमेर लष्करी तळाजवळ झालेल्या भीषण एसयूव्ही अपघातात भारतीय लष्करातील मेजर हमजा आरिफ यांचा मृत्यू झाला, तर दोन लेफ्टनंट अधिकारी गंभीर जखमी झाले.
Jaisalmer SUV Accident
Jaisalmer SUV Accident
Published On

Army major killed a month after marriage : राजस्थानमधील जैसलमेर लष्करी तळाजवळ (Jaisalmer Military Station) एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या भरधाव एसयूव्ही (SUV) गाडीचा अपघात होऊन यामध्ये भारतीय लष्करातील एका ३२ वर्षीय मेजरचा (Major) जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन लेफ्टनंट दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री हे तिन्ही अधिकारी आपल्या वैयक्तिक एसयूव्ही कारने जात होते. पण अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विजेच्या खांबावर आणि भिंतीवर जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि सैन्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मेजर अधिकाऱ्याला मृत घोषित केले. इतर दोन जखमी अधिकाऱ्यांवर सध्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Jaisalmer SUV Accident
Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

जैसलमेर मिलिटरी स्टेशनजवळ गुरुवारी रात्री उशिरा अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ लष्करी अधिकारी खासगी एसयूव्हीमधून जैसलमेर लष्करी तळावर परत येत होते. जवळ आल्यानंतर एक उंट अचानक रस्त्यावर आला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् विजेच्या खांबाला धडकून पलटी झाली. कारचा वेग जास्त असल्यामुळे अपघातानंतर ती १०० मीटर फरफटत गेली होती.

Jaisalmer SUV Accident
डोंबिवलीतील संतापजनक घटना! १६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपीत २ अल्पवयीन मुलांचा समावेश

अपघाताची माहिती मिळताच लष्करी जवान आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाहनाचा चक्काचूर झाल्यानंतर त्यात अडकलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना बाहेर काढून जैसलमेर लष्करी तळावरील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी असलेले ३० वर्षीय मेजर हमजा आरिफ यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे लग्न महिनाभरापूर्वीच झाले होते. लेफ्टनंट अभिनव राठोड आणि लेफ्टनंट आयुष्मान गुसाईन या दोन जखमी अधिकाऱ्यांवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जैसलमेर लष्करी तळावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com