Hingoli News : मराठा आरक्षणासाठी उच्चशिक्षित तरुणाने संपविले जीवन; हिंगोलीतील घटना

Hingoli News : मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे, आज पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येत असलेल्या पोटा खुर्द गावामध्ये उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे
Hingoli News Maratha Aarkshan
Hingoli News Maratha AarkshanSaam tv
Published On


हिंगोली : मराठा आरक्षणासाठी अजूनही लढा सुरु आहे. या आंदोलनादरम्यान अनेकांनी आत्महत्या केल्याच्या (Hingoli) घटना घडल्या आहेत. यात पुन्हा हिंगोलीत उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये आढळून आला आहे. (Live Marathi News)

Hingoli News Maratha Aarkshan
Jalgaon News : गिरणा नदीच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू; वाळू उपोषणे झालेल्या खड्ड्यामुळे गेला बळी


मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे, आज पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येत असलेल्या पोटा खुर्द गावामध्ये उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे, योगेश कुंडलिक लोणसणे (वय २१) असे गळफास घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. योगेशने शेतातील झाडाला गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे, दरम्यान औंढा पोलिसांना योगेशच्या खिशामध्ये सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आपण मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे,

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli News Maratha Aarkshan
Thane Crime: दीराकडे राहायला आली होती पत्नी आणि २ मुलं; भेटायला आलेल्या क्रूर पतीनं तिघांनाही संपवलं

परिवाराचा आक्रोश 
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी योगेशचा मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी औंढा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान योगेशने आत्महत्या केल्याचे परिवाराला समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com