Shivjayanti News : आग्रा येथील लाल किल्ल्यात सिनेमाला परवानगी देता मग शिवजयंतीला का नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला केला आहे. तसेच ८ तारखेपर्यंत परवानगी नाकारल्या बाबत आपले म्हणणे मांडा असे निर्देश उच्च न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला दिले आहेत. या प्रकरणावर आता ८ तारखेला पुढील सुनावणी होणार आहे.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागीतली होती. मात्र पुरातत्व खात्याने त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आग्रा येथील लाल किल्ल्यात पुरस्कार सोहळे, म्यूझील कॉन्सर्ट अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाते, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वलंत इतिहासाचा संबंध असूनही शिवजयंती साजरी करण्याला परवानगी का दिली जात नाही? भारतीय पुरातत्त्व विभागाला या कार्यक्रमाला परवानगी देण्यात काय अडचण काय? असे प्रश्न उपस्थित करत अजिंक्य देवगिरी फाऊंडेशनतर्फे दिल्ली उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर आता ८ तारखेला पुढील सुनावणी होणार आहे.
या कार्यक्रमाला परवानगी मिळावी या संदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुरातत्त्व खात्याला पत्र लिहिले होते. मात्र त्याला देखील पुरातत्व विभागाने उत्तर दिले नाही. गेल्या दीड महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाकडून परवानगी देण्यास टाळाटाळ करण्याच येत आहे. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहात आग्रातील घटनेला अतिशय महत्त्व आहे. आग्रा येथे शिवाजी महाराजांना बोलवून औरंगजेबाने त्यांना आणि युवकाज संभाजीराजे यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने औरंगजेबाच्या हातावर तूरी देऊन तेथून संभाजीराज्यांसह स्वत:ची सुटका केली होती. हाच संदर्भ देत आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
Edited By - Chandrakant Jagtap
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.