PM Narendra Modi's Popularity : PM मोदी जगात भारी!, दिग्गज नेत्यांना मागे टाकत लोकप्रियतेत पहिल्या स्थानी

PM Modi Is Most Popular : पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल २२ देशांतील दिग्गज नेत्यांना लोकप्रियतेत मागे टाकून पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSAAM TV

PM Modi Most Popular Leader In World : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रियतेच्या बाबतीत जगात 'भारी' ठरले आहेत. अव्वल २२ देशांतील दिग्गज नेत्यांना त्यांनी लोकप्रियतेत मागे टाकून पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.

नुकत्याच झालेल्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जगात लोकप्रियतेत सर्वोच्च स्थानी पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक पातळीवर PM मोदींची रेटिंग ७८ टक्के इतकी आहे. सप्टेंबर २०२१ नंतर पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे दिसून आल्याचे सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. (PM Modi News)

PM Narendra Modi
IND vs NZ 3rd T20 : मोदी स्टेडियमवर गिलचा धुमाकूळ; ५४ चेंडूत ठोकलं शतक, न्यूझीलंडसमोर २३५ धावांचं आव्हान

पंतप्रधान मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेज ओब्राडोर हे ६८ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलैन बेरसेट आहेत. त्यांचे अप्रुव्हल रेटिंग ६२ टक्के आहे. (Latest News In Marathi)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एथनी अल्बानीज हे ५८ टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहेत. तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला डीसिल्व्हा हे ५० टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पाचव्या स्थानी आहेत.

PM Narendra Modi
BBC Documentary वरून सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, फक्त ३ आठवड्यात...

बायडेन, सुनक कितव्या स्थानी?

अमेरिकी अध्यक्ष जो बायडन यांची अप्रुव्हल रेटिंग घटली आहे. ते स्वतःच्याच देशात फारसे चर्चेत नाहीत. त्यांना ४० टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळाली आहे. बायडेन हे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत सहाव्या स्थानी आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे फारसे चर्चेत दिसत नाहीत. मॉर्निंग कन्सल्टने त्यांना जागतिक नेत्यांच्या यादीत १० वे स्थान दिले आहे. त्यांना ३० टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळाली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांना या यादीत ११ वे स्थान दिले आहे. त्यांनी अप्रुव्हल रेटिंग २९ टक्के आहे.

PM Narendra Modi
Narendra Modi: मोदी स्टेडियमवर पहिल्यांदाच येणार PM मोदी; 'या' सामन्याला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह लावणार हजेरी

सर्वेक्षण कसे घेतले जाते?

मॉर्निंग कन्सल्ट दररोज २० हजारांहून अधिक लोकांची मुलाखत घेतं. त्यातून मिळालेल्या डेटाच्या आधारे अहवाल तयार केला जातो. त्यावरून जागतिक नेत्यांची रँकिंग ठरवली जाते. अमेरिकेत सर्वेक्षणात ४५ हजार नागरिकांचा समावेश होता. तर अन्य देशांमध्ये ५०० ते ५००० नागरिकांचा सहभाग असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com