Ind Vs Aus Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ९ फेब्रूवारीपासून पहिला कसोटी सामना रंगणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. क्रिकेटप्रेमींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या बॉर्डर गावसकर ट्रॉफीची उत्सुकता लागली आहे.
कारण मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह उपस्थिती लावणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. (Test Series)
याबाबत अधिक माहिती अशी की, भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजमधला चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. पुढच्या महिन्यात 9 मार्चपासून हा कसोटी सामना सुरु होईल. स्टेडियम दुरुस्त करुन त्याला पंतप्रधान मोदींच नाव देण्यात आले. त्यानंतर मोदी (Narendra Modi) पहिल्यांदाच या स्टेडियममध्ये येणार आहेत.
२०१७ नंतर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. ९ फेब्रुवारीपासून नागपुरात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यावेळी कांगारूंना मायदेशात हरवण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाला असणार आहे, कारण २०१८-१९ आणि २०२०-२१ या वर्षात भारताने त्यांना त्यांच्याच घरामध्ये दोनदा पराभूत केले आहे.
या टेस्ट सीरीजच्या तयारीसाठी टीम इंडिया आज 2 फेब्रुवारीला नागपूरमध्यए एकत्र होणार आहे. जामठा येथील नव्या स्टेडियममध्ये 3 ते 8 फेब्रुवारी दरम्यान खेळाडूंच ट्रेनिंग सेशन होईल. 9 फेब्रवारीला नागूपरमध्ये पहिला कसोटी सामना होईल. त्यानंतर दिल्ली, धर्मशाळा आणि अहमदाबादमध्ये कसोटी सामने होतील.
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक...
पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.