Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

Heatwave alert for vidarbha Nagpur : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
MAHARASHTRA HEATWAVE ALERT
MAHARASHTRA HEATWAVE ALERT Saam Tv
Published On

Nagpur heatwave yellow alert latest news : राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे, पण विदर्भात सू्र्य मात्र अद्याप कोपलेलाच आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान ४० च्या पार गेले आहे. हवामान विभागाकडून विदर्भातसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

तर आज (ता. १५) मराठवाड्यातील छत्रपती छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता आहे. तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून, हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात १६ ते १८ मे या कालावधीत उष्णतेच्या तीव्र लाटेचा (Heat Wave) 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सूचना जारी केल्या आहेत. वाढत्या उष्म्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४:३० या वेळेत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनास सक्त मनाई करण्यात आली आहे.

MAHARASHTRA HEATWAVE ALERT
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

विभागीय आयुक्तांनी विद्यार्थी, शेतमजूर आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. उन्हाच्या तीव्रतेत काम करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा आणि उष्माघाताचा धोका टळू शकेल, यासाठी स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MAHARASHTRA HEATWAVE ALERT
Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

मे आणि जून या २ महिन्यात विदर्भात उष्णतेचा अलर्ट लागू राहणार आहे. नागपूर व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात यासंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना 16 जून पर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत सांगितले.

मॉन्सून शनिवारी अंदमानात दाखल होणार -

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अंदमानातील आगमनासाठी पोषक स्थिती तयार झाली. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रात ढगांची रेलचेल वाढली आहे. शनिवारपर्यंत (ता. १६) अंदमान - निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

MAHARASHTRA HEATWAVE ALERT
Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com