Accident: वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना अनर्थ घडला, १०० फूटांवरून कार जगबुडी नदीत कोसळली; मुंबईतल्या ५ जणांचा करुण अंत

Ratnagiri Car Accident: रत्नागिरीमध्ये भीषण कार अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जात असताना कार जगबुडी नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident News: वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला, १०० फूटावरून कार जगबुडी नदीत कोसळली; ५ जणांचा करुण अंत
Ratnagiri Accident Saam Tv
Published On

मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडजवळ भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. कार १०० फुटांवरून नदीत कोसळली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामधील सर्व मृत आणि जखमी हे मुंबईत राहणारे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मिरारोड येथे राहणारे काही जण वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कोकणातील देवरुख येथे जात होते. पहाटेच्या दरम्यान हे सर्वजण खेड येथे पोहचले. खेडमधील जगबुडी पुलावर चालकाला अंदाज न आल्याने कार नदीपात्रात कोसळली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या त्यांच्या मुलीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच देवरूख गावावर शोककळा पसरली.

Accident News: वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला, १०० फूटावरून कार जगबुडी नदीत कोसळली; ५ जणांचा करुण अंत
Porsche Car Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघाताला वर्ष पूर्ण, आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या A to Z

विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत (भाचा), परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर हे सर्वजण कारमधून प्रवास करत होते. मिताली मोरे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या आपले कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत माहेरी जात होत्या. या अपघातामध्ये मेधा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे, श्रेयस सावंत या ५ जणांचा मृत्यू झाला. पराडकर कुटुंब नालासोपारा येथे राहत होते. तर मोरे कुटुंबीय मिरा-भाईंदरमध्ये राहत होते.

Accident News: वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला, १०० फूटावरून कार जगबुडी नदीत कोसळली; ५ जणांचा करुण अंत
Ratnagiri Accident : अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, जगबुडी नदीत कार कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू

मिताली मोरे यांच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त कळातच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे सर्वजण रात्री साडेअकराच्या सुमारास कारने देवरूख या गावी अंत्यसंस्कारासाठी जायला निघाले. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदी पुलावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार थेट १०० फुटांवरून नदीत कोसळली. अपघाताची ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढले आणि गंभीर जखमी झालेल्या परमेश पराडकर आणि विवेक मोरे यांना कळंबणी येथील रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

Accident News: वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला, १०० फूटावरून कार जगबुडी नदीत कोसळली; ५ जणांचा करुण अंत
Horrific Accident : हृदयद्रावक!! एक वर्षाच्या चिमुकल्यानं आईच्या कुशीतच सोडला जीव, सोलापुरात आगीत होरपळून ८ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com