Porsche Car Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघाताला वर्ष पूर्ण, आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या A to Z

Porsche Car Accident Update: पुण्यातील पोर्शे कार अपघाताला एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं याची A to Z टाइमलाइन.
Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car AccidentSaam Digital
Published On

पुण्यातील पोर्शे कार अपघाताला आज १ वर्ष पूर्ण झालं. भरधाव पोर्शे कार चालवून अल्पवयीन मुलाने या अपघातामध्ये दोघांना चिरडलं होतं. पोर्शे कार अपघातात तरुण आणि तरुणीने आपला जीव गमावला होता. या प्रकरणात आरोपी मुलाला अटक करण्यात आली होती. पण अल्पवयीन असल्यामुळे नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात दोषी ठरवत मुलाचे आई-वडील आणि आजोबा यांना अटक करण्यात आली होती. पण काही महिन्यात मुलाच्या आईची देखील जामीनावर सुटका करण्यात आली.

पुण्यातील पोर्शे कार अपघाताची आत्तापर्यंत A to Z कहाणी -

१८ मे: मध्यरात्री २ वाजता पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगात असलेल्या कारने घेतला २ जणांचा जीव

१८ मे: मध्यरात्री ३ वाजता या अपघातात महागडी गाडी चालवणारा तरुण हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न. तसेच तो एका नामांकित व्यावसायिकाचा मुलगा

१९ मे: पहाटे ४ वाजता येरवडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची धाव.

१९ मे: पहाटे ५ वाजता येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

१९ मे: दुपारी ३ वाजता तरुण अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाकडून अटी शर्ती घालून त्याला जामीन

Pune Porsche Car Accident
Pune News : किल्ला चढताना छातीत तीव्र वेदना, पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचा सिंहगडावर हार्ट ॲटॅकनं मृत्यू

२० मे: सकाळी १० वाजता अल्पवयीन तरुणाच्या वडिलांवर गुन्हा दाखल

२० मे: ज्या ठिकाणी या अल्पवयीन तरुणाने पार्टी केली त्या पब आणि हॉटेल व्यवस्थापक, मालकावर गुन्हा

२१ मे: सकाळी ५ वाजता अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अगरवाल यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली संभाजीनगरमधून अटक

२१ मे: दुपारी ३ वाजता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे पोलिसांसोबत पुण्यात बैठक

२१ मे: संध्याकाळी ५ वाजता विशाल अगरवाल याला घेऊन पोलीस पुण्यात दाखल

२१ मे: संध्याकाळी ६ वाजता पुणे पोलिसांनी अल्पवयीन तरुण सज्ञान म्हणून कोर्टाने खटला चालवावा याची केली मागणी

Pune Porsche Car Accident
Pune Congress: पुण्यात काँग्रेसला खिंडार, शिंदे गटाची ताकद वाढली; बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण घेतलं हाती

२२ मे: दुपारी १२ वाजता अल्पवयीन तरुणाला बाल न्याय मंडळात करण्यात आलं हजर

२२ मे: विशाल अगरवाल याला न्यायलयाने सुनावली ३ दिवसांची पोलीस कोठडी

२२ मे: अल्पवयीन तरुणाची ५ जून पर्यंत बाल सुधारगृहात रवानगी

२३ मे: सुरेंद्र अगरवाल यांची पुणे पोलिसांकडून चौकशी

२७ मे: अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर यांना अटक

१ जून: अल्पवयीन तरुणाची आई शिवानी अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक

३ जून: रक्ताचे नमुने बदलण्याचा मास्टरमाईंड डॉ अजय तावरे हे सिद्ध

४ जून: ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे दिल्याप्रकरणी अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक

१० जून: अल्पवयीन तरुणाचा बाल निरीक्षण गृहातील मुक्काम वाढला

१४ जून: विशाल आणि शिवानी अगरवाल यांच्यासह इतर २ जणांची येरवडा कारागृहात रवानगी

१५ जून: अल्पवयीन तरुणाला बाहेर सोडण्याचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

Pune Porsche Car Accident
Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करत नागरिकांना मारहाण| VIDEO

१७ जून: पुणे पोलिसांकडून अपघाताचा अहवाल बाल न्याय मंडळाला सादर

२५ जून: मुंबई उच्च न्यायालयाने दिला अल्पवयीन तरुणाला जामीन

१३ जुलै: शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

११ ऑक्टोबर: अल्पवयीन तरुणाला कागदपत्रांची पडताळणी न करता जामीन मंजूर केलेल्या बाल न्याय मंडळाचे २ सदस्यांना केलं बरखास्त

२५ ऑक्टोबर: अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉक्टर यांच्यावर खटला सुरू .

५ नोव्हेंबर: अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

५ डिसेंबर: कोर्टाकडून आरोपींची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांना पुन्हा परवानगी

१० फेब्रुवारी २०२५: अटक बेकायदेशीर असं म्हणत अल्पवयीन तरुणांच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

२० एप्रिल २०२५: ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द

२२ एप्रिल २०२५: अल्पवयीन तरुणाची आई शिवानी अगरवाल तब्बल ११ महिन्यांनी जेल बाहेर

१७ मे २०२५: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांचे न्यायालयात पत्र, खटला जलदगतीने चालवण्यासंदर्भात विनंती

Pune Porsche Car Accident
Pune News: राज्यात एकाच दिवशी ३ तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू, खेड, पिंपरी-चिंचवड अन् मावळमध्ये हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com