MIDC Solapur fire News Update : सोलापूरमध्ये अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अख्ख कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटना झालेला कारखाना उस्मानभाई यांचा आहे. या आगीत 8 निष्पापांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आगीनं एक वर्षाच्या चिमुकल्याचाही बळी घेतला आहे. त्या चिमुकल्यानं आईच्या कुशीतच जीव सोडल्याची घटना समोर आली आहे. बचावासाठी बेडरुममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहिवरून आलं होतं.
आगीपासून बचाव करण्यासाठी जिवाच्या आंकातेने, मंसुरी कुटुंबीय वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये गेले. पण, काळ बनून आलेल्या आगीत होरपळून उस्मानभाईंच्या कुटुंबीतील ५ जण आणि कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला. या आगीत उस्मानभाईचा नातू, मुलगा, सून अख्ख कुटुंबच संपलं. निदान आपलं बाळं तरी वाचेल म्हणून आईनं एक वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत ठेवलं. परंतू आईसह चिमुकल्यानेही आईच्या कुशीतच जीव सोडला. बचावासाठी बेडरुममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही आईच्या कुशीतलं बाळ पाहिल्यावर तेही सुन्न झाले.
या भीषण आगीत एकूण 8 जणांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मंसूरी (वय 87), अनस मंसूरी (वय 24), शीफा मंसूरी (वय 22), युसुफ मंसूरी (वय 1 वर्ष), आयेशा बागवान (वय 38), मेहताब बागवान (वय 51), हिना बागवान (वय 35), सलमान बागवान (वय 38) असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.