Good News: विदर्भासाठी आनंदाची बातमी! पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Wainganga Nalganga River Linking Project: विदर्भातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. यासाठी फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली.
Good News: विदर्भासाठी आनंदाची बातमी! पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, फडणवीस सरकारची मोठी घोषणा
CM Devendra FadnavisSaam Tv
Published On

Summary -

  • वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाला फडणवीस सरकारने मंजुरी दिली

  • विदर्भातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार

  • ८ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यांना पाणीपुरवठा आणि सिंचनाचा लाभ

  • ४ लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार

विदर्भातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण फडणवीस सरकारने विदर्भासाठी मोठी घोषणा केली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली. त्यामुळे विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे ३८८.२८ किलोमीटर लांबीचा कालवा तयार होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला.

विदर्भातील एकूण ८ जिल्ह्यातील ३८ तालुक्यामधून हा कालवा जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पात एकूण २०.४९ किलोमीटरच्या १३ बोगद्यांचा समावेश असणार आहे. हा प्रोजेक्ट विदर्भासाठी गेम चेंजर ठरणार आहे. विदर्भातील नागरिकांचा पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न सुटणार आहे.

Good News: विदर्भासाठी आनंदाची बातमी! पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, फडणवीस सरकारची मोठी घोषणा
Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ई-पीक पाहणी न झालेल्यांना 'ऑफलाईन'चा पर्याय उपलब्ध; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

या प्रकल्पामुळे तब्बल ४ लाख ४ हजार २८१ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पातून १,८०४.७८ दलघमी म्हणजेच ६४ टीएमसी कृषी आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ३१ हजार ४९४ हेक्टर एवढे भूसंपादन होणार आहे. पुढच्या १० वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त ३९ गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे.

Good News: विदर्भासाठी आनंदाची बातमी! पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, फडणवीस सरकारची मोठी घोषणा
Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यापुढे माणसांप्रमाणे जमिनींसाठी मिळणार भू आधार क्रमांक; काय फायदा होणार?

या प्रकल्पाला आवश्यक पर्यावरण, वन, केंद्रीय जल आयोग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण यांच्या मान्यता घेण्यात येणार आहेत. प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना या सौर उर्जेवर चालवण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त जमीन घेण्यात येणार आहे. प्रकल्पाचे लाभ व्यय गुणोत्तर (BCR) १.५८ व अंतर्गत परतावा दर (IRR) १४.६१ इतका आहे. फडणवीस सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे विदर्भातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Good News: विदर्भासाठी आनंदाची बातमी! पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, फडणवीस सरकारची मोठी घोषणा
Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com