अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी सुरु केलेली गौप्यस्फोटांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही... आधी पूर्व विदर्भातील नेत्याचा उल्लेख करुन रोहित पवारांनी संशयाचं धुकं अधिक गडद केलं होतं.. मात्र आता पूर्व विदर्भातील राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल हेच असल्याचं समोर आलंय.. रोहित पवारांच्या दाव्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनीही प्रफुल्ल पटेल यांच्या फाईलमुळे दादांना उशीर झाल्याचं म्हटलंय..
दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही दादांसोबतची नियोजित बैठक 7 पर्यंत संपल्याचा दावा केलाय... दुसरीकडे रोहित पवारांनी पुन्हा एकदा तटकरेंची उपस्थिती आणि प्रफुल्ल पटेलांच्या फोनचा संदर्भ देत नवा संशय व्यक्त केलाय...
27 जानेवारीला मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली.. त्यानंतर अजितदादा सायं. 5 पर्यंत रस्तामार्गे पुण्याला जाणार होते.. मात्र सायं 5 वाजून 10 मिनिटांनी सुनील तटकरे दादांच्या भेटीला दाखल झाले.. तटकरे आणि अजितदादांमध्ये बैठक झाली.. याच दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी राईस मिलसंदर्भातील महत्वाच्या फाईलवर सही कऱण्यासाठी दादांना फोन केला... मात्र फाईल मंत्रालयात असल्याचं समजलं.. त्यानंतर दादांनी ती फाईल मंत्रालयातून मागवली.. मात्र ट्रॅफिकमुळे फाईल येण्यासाठी उशीर झाला... आणि याच गोष्टीमुळे दादांनी कारने जाण्याचा प्लॅन बदलला आणि रात्री 7.13 ला खासगी विमान बुक केलं... आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच विमानाच्या अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला...
दुसरीकडे रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या संशयाशी आपण सहमत असल्याचं मत रोहयो मंत्री भरत गोगावलेंनी व्यक्त केलंय..
अजितदादांच्या मृत्यूवरुन संशयाचं धुकं निर्माण झालेलं असताना आता रोहित पवारांनी पायलट अपघाताच्या आधी कुणाकुणाला भेटला होता, त्याची चौकशी कऱण्याची मागणी केलीय..
त्यामुळे दादांच्या अपघाताची सखोल चौकशी झाल्यास दादांचा घातपात आहे की अपघात, हे स्पष्ट होणार आहे...नाहीतर दादांच्या विमान अपघाताभोवती आरोपांच्या घिरट्या सुरुच राहतील....आणि त्यामुळे संशयाचं धुकं निवळण्याऐवजी आणखी गडद होत राहील...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.