Crime News : रेल्वे स्टेशनवर आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा अखेर गजाआड

गोंदियात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन विनयभंग आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Gondia Crime News
Gondia Crime NewsSaam Tv

Gondia Crime News : गोंदियातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. गोंदियात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन विनयभंग आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला पळवून विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया शहरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. मनोज टेकाम असे आरोपीचे नाव आहे. गोंदियाच्या (Gondia) मक्कीटोला येथे राहणारा हा आरोपी हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता.

Gondia Crime News
Crime News: धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने महिलेने केली स्वतःच्याच घरात चोरी; 'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात

नेमकं काय घडलं?

गोंदिया शहर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतून जानेवारी २०२३ मधून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली होती. आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणातील आरोपी मनोज टेकाम हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती.

Gondia Crime News
Kalyan Crime News: पैशांसाठी बंद घर अन्‌ नशेसाठी मेडिकलमधून चोरायचे औषधी; पेट्रोलिंग करताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी आरोपी मनोजचा तपास करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांच्या पथकास तांत्रिक माहितीवरून तसेच पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून फरार मनोज गोंदिया स्टेशनवर आलेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकांनी रेल्वे स्टेशन गोंदिया येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले.

गुन्हयातील फरार आरोपी असलेला आरोपी मनोज टेकाम असल्याची खात्री सखोल चौकशीअंती पटली. त्यानंतर पोलीस ठाणे गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई गोंदिया शहर पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com