Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

Kalyan Crime News: पैशांसाठी बंद घर अन्‌ नशेसाठी मेडिकलमधून चोरायचे औषधी; पेट्रोलिंग करताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात

पैशांसाठी बंद घर अन्‌ नशेसाठी मेडिकलमधून चोरायचे औषधी; पेट्रोलिंग करताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात
Published on

अभिजीत देशमुख

कल्याण : मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे शहरात रात्री घरफोड्या व नशेसाठी मेडिकलमध्ये कोरेक्स औषध चोरी करणाऱ्या दोन नशेखोर सराईत चोरट्यांना (Dombivali) डोंबिवली मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्‍यांच्‍याकडून (Gold) सोने– चांदीचे दागिने व रोकड मिळून २१ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Tajya Batmya)

Kalyan Crime News
Holi Festival 2023: अशी धुळवड कधी ऐकली नसेल..गावातून निघून गेले २०० जावई; अख्खी सासुरवाडी शोधायला निघाली

उसरघर परिसरात मानपाडा (Police) पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असताना हे दोन्ही चोरटे दुचाकीने येत होते. पोलिसांना पाहून दोघांनी गाडी तिथेच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोन्ही चोरटे एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मानपाडा पोलिसांनी त्यांना ओळखले व तत्काळ पाठलाग करत पकडले. सरूद्दीन शेख व मोहम्मद शहा अशी या दोन चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरोधात कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणेमधील विविध पोलीस ठाण्यात तब्बल २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासा दरम्यान पोलिसांनी या दोघांकडून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. चौकशी दरम्यान पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांकडून मानपाडा टिळकनगर, विष्णूनगर व नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १२ चोऱ्या उघडकीस आणल्या असून त्यांच्याकडून ३५ तोळे सोन्याचे व ६२ तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २१ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com