Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Gold And Silver Price Drop In Jalgaon Sarafa Market: जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं ३००० रुपयांनी तर चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price DropSaam Tv
Published On
  • सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली

  • सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा

  • 24 कॅरेट सोनं 3,000 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे दर 1,40,130 रुपयांवर आले

  • 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही झाले कमी

  • चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये आज मोठी घसरण झाली. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. सोनं-चांदीचे दर स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.

आज जळगावच्या सराफा बाजारामध्ये २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १० तोळा सोनं ३०,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १४ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत होती. आज दर कमी झाल्यामुळे ग्राहक आनंदी आहेत.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या २४ कॅरेट आणि २२ कॅरेटचे ताजे भाव

तर दुसरीकडे जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. १ तोळा चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज चांदी २ लाख २० हजार रुपयांना विकली जात आहे. गेल्या ८ दिवसांत सोनं १०,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी २०,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याची घोषणा होताच सोनं-चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

दरम्यान, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,७८० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं १,४०,१३० रुपयांना विकले जात आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,५५० रुपयांची घसरण झाली असून हे सोनं १,२८,४५० रुपयांना विकले जात आहे. तर १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,०८० रुपयांची घसरण झाली असून हे सोनं १,०५,१०० रुपयांना विकले जात आहे. तर आज चांदीच्या दरामध्ये १०,००० रुपयांची घसरण झाली असून चांदी २,३५,००० रुपयांना विकली जात आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com