Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १ तोळा किती रुपयांनी वाढले? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold- Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली. जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्‍या दरात १ हजार तर सोन्याच्या दरामध्ये ७०० रूपयांनी वाढ झाली. खरेदी करण्यापूर्वी आजचे दर किती?
Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १ तोळा किती रुपयांनी वाढले? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Rate TodaySaam Tv
Published On

Summary -

  • महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ

  • १ तोळा सोनं १,४९,२०० रुपयांवर पोहोचलं

  • चांदीचा दर २,४४,००० रुपये प्रति किलो

  • दरवाढीमुळे ग्राहकांचा खरेदीकडे कमी कल

अजय सोनवणे, जळगाव

महिन्याच्या शेटवच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात सोनं- चांदीच्या भावात गेल्या दोन दिवस घसरण झाली. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्‍याचे पाहायला मिळाले. आज चांदीच्‍या दरात १ हजार तर सोन्याच्या दरामध्ये ७०० रूपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी आज सोनं-चांदी खरेदी करण्याकडे पाठ फिरवली.

मागील काही दिवसांपासून सोनं- चांदीच्‍या भावात सातत्‍याने चढ- उतार होत आहेत. गेल्‍या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील दर कधी कमी तर कधी वाढले होते. दरम्‍यान मागील दोन दिवसांपासून सातत्‍याने दर कमी झाले आहेत. सोमवारी २७ एप्रिल रोजी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर विनाजीएसटी १ लाख ५१ हजार ५०० रुपये झाले होते. हे दर गुरूवारपर्यंत खाली येऊन १ लाख ४८ हजार ५०० रूपयांवर आले होते. १ किलो चांदीचे दर सोमवारी २७ एप्रिल रोजी विनाजीएसटी २ लाख ४८ हजार रुपये होती. त्यात घसरण होऊन चांदी २ लाख ४३ हजारांपर्यंत खाली आली होती. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १ तोळा किती रुपयांनी वाढले? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

बुधवारी २९ एप्रिलच्या तुलनेत सोनं आणि चांदीच्‍या दरात वाढ झाली आहे. गुरूवारी सोने १ लाख ४८ हजार ५०० रूपये होते. आज सकाळी सोन्याच्या दरामध्ये ७०० रुपयांनी वाढ झाली. सोन्याचे दर १ लाख ४९ हजार २०० रूपयांवर पोहचले. तर सकाळी चांदीचे दर २००० रूपयांनी खाली येऊन २ लाख ४१ हजार रूपयांवर आले हेाते. मात्र सायंकाळपर्यंत यात पुन्‍हा ३ हजारांनी वाढ होऊन दर २ लाख ४४ हजार रूपयांवर पोहचले आहेत.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १ तोळा किती रुपयांनी वाढले? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Rate Today: सोनं पुन्हा एकदा महागलं; चांदी मात्र स्थिर; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

सुवर्णनगरीतील १ तोळा सोन्याचे (विनाजीएसटी) दर किती?

२४ एप्रिल - १ लाख ५० हजार ५००

२५ एप्रिल - १ लाख ५१ हजार ५००

२६ एप्रिल - १ लाख ५१ हजार ५००

२८ एप्रिल - १ लाख ४९ हजार ५००

२९ एप्रिल - १ लाख ४८ हजार ५००

३० एप्रिल - १ लाख ४९ हजार २००

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १ तोळा किती रुपयांनी वाढले? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; ऐन लग्नसराईत २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

सुवर्णनगरीतील चांदीचे प्रतिकिलो (विनाजीएसटी) दर किती?

२४ एप्रिल- २ लाख ४५ हजार

२५ एप्रिल- २ लाख ४९ हजार

२६ एप्रिल - २ लाख ४८ हजार

२८ एप्रिल - २ लाख ४२ हजार

२९ एप्रिल - २ लाख ४३ हजार

३० एप्रिल - २ लाख ४४ हजार

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १ तोळा किती रुपयांनी वाढले? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण; १० तोळ्यामागे २३,४०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com