Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १२३६० रुपयांनी झालं स्वस्त; आजचे 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Gold Price At Jalgaon Sarafa Market: जळगावच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १२३६० रुपयांनी झालं स्वस्त; आजचे 18k- 22k आणि 22k चे दर किती?
Gold-Silver Price TodaySaam tv
Published On
  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • सोन्याच्या दरात १२,३६० रुपयांची मोठी घसरण

  • २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १,५६,५६० रुपयांवर आले

  • १ तोळा चांदीच्या दरातही १२,३६० रुपयांची घसरण

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पुन्हा सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी जळगावचा सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२३६० रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरामध्ये १२,३६० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज सराफा बाजारात सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी दिवसभरात २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरामध्ये २०६० रुपयांची घसरण झाली होती. २४ कॅरेट सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५७,७९६ रुपयांपर्यंत खाली आले होते. शनिवारी सकाळी सराफा बाजार उघडल्यावर १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आणखी १२३६ रुपयांची घट नोंदवली गेली. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२३६० रुपयांची घसरण झाली. आज हे सोनं जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,५६० रुपयांपर्यंत घसरले. दोन दिवसांत सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३२९६ रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १२३६० रुपयांनी झालं स्वस्त; आजचे 18k- 22k आणि 22k चे दर किती?
Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १५००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील 18k, 22k आणि 24k चे दर किती?

तर, जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी दिवसभरात चांदीच्या दरामध्ये कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर ३ टक्के जीएसटीसह प्रति किलो २,७०,८९० रुपयांपर्यंत स्थिर होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सराफा बाजार उघडल्यावर चांदीच्या दरामध्ये तब्बल १२,३६० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी प्रति किलो २,५८,५३० रुपयांपर्यंत घसरली. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १२३६० रुपयांनी झालं स्वस्त; आजचे 18k- 22k आणि 22k चे दर किती?
Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. अधिक मासासाठी दागिने, भेटवस्तू खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना त्यामुळे आनंद झाला. उलाढाल वाढीच्या आशेने सुवर्ण व्यावसायिंकाकडूनही मौल्यवान धातूंचे दर कमी झाल्यानंतर समाधान व्यक्त करण्यात आले. आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.

पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावामुळे आठवड्याच्या सुरुवातीला सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं-चांदीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींना सुरुवातीला चांगला आधार मिळाला होता. मात्र, आठवड्याच्या अखेरीस परिस्थितीत मोठा बदल दिसून आला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने - चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १२३६० रुपयांनी झालं स्वस्त; आजचे 18k- 22k आणि 22k चे दर किती?
Gold Silver Price Today : खुशखबर! सलग तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com