गोकुळ निवडणुकीवरून राजकारण रंगलं, जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

Gokul Milk Union Polls: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणूक आता चांगलीच रंगलीये. निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीनं सर्वाधिक जागांची मागणी केलीये. मात्र, भाजपच्या खेळीनं राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा सुरूये. जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला काय आहे?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
GOKUL MILK UNION ELECTION
GOKUL MILK UNION ELECTIONsaam tv
Published On: 

गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीनं कोल्हापूरचं राजकारण ढवळून टाकलंय. दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी या निवडणुकीसाठी कोल्हापूरात तळ ठोकला होता. मात्र, गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीतील जागावाटपाच्या तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न केले जाताहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलाय. दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला नेमका काय आहे?... ते पाहूयात...

गोकुळसाठी महायुतीचा फॉर्म्युला

भाजप - 7 जागा

शिंदेसेना - 7 जागा

राष्ट्रवादी(AP) - 9 जागा

जनसुराज्य शक्ती - 2 जागा

दरम्यान, या संभाव्य जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्यानं मंत्री हसन मुश्रीफ कमालीचे नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. एव्हंढच नव्हे तर भाजपकडून राष्ट्रवादी मंत्री मुश्रीफांची बार्गेनिंग पावर कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. खरंतर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जवळपास 1971 संस्थांचे ठराव दाखल केल्याचा दावा केलाय. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफांनी सर्वाधिक जागांची मागणी लावून धरलीये. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत पुन्हा एकदा खलबतं होणार आहेत. त्यामुळे आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अधिक चुरस रंगलीये...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com