Gokul: गोकुळमध्ये ट्विस्ट; महायुतीची सत्ता? 10 नोव्हेंबरला ठरणार कारभारी

Gokul Dairy Row In Kolhapur : सहकाराची पंढरी मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील 'गोकुळ' दूध संघाचा सत्तासंघर्ष आता टोकाला पोहोचलाय. एकीकडे अध्यादेश जारी करत महायुतीने गोकुळवर सत्ता स्थापनेचा मोठा डाव टाकलाय, तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी याविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा एल्गार पुकारलाय. त्यामुळे गोकुळच्या राजकीय दूधाला कशी उकळी फुटलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Gokul Dairy Row In Kolhapur
Gokul Dairy Power Struggle: Mahayuti's Bid For Control, Big Decision On November 10saam tv
Published On: 

गोकुळवर शासननियुक्त सदस्य नेमण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण सरकारनं अध्यादेश जारी केलाय. विरोधकांना न जुमानता गोकुळवर 4 शासननियुक्त सदस्य आणि 1 शासकीय सदस्य नियुक्त करण्याचा अध्यादेशाला राज्यपालांची मंजुरी मिळालीय. या 4 शासननियुक्त सदस्य़ांना मतदानाचा अधिकारही मिळणार आहे. आता यावरून गोकुळचा संघर्ष रस्त्यावर येणार आहे. य़ा अध्यादेशाविरोधात 9 नोव्हेंबरला सतेज पाटलांनी संघर्ष मोर्चाची हाक दिलीय. या अध्यादेशानुसार कोणाला शासननियुक्त सदस्य होता येणार आहे. पाहूयात.

Gokul Dairy Row In Kolhapur
NCP Merger: राजकीय घडामोडींना वेग! पार्थ पवारांसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला; सिल्व्हर ओकवर खलबतं

सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधकाचा दर्जा असलेल्या एका शासकीय अधिकाऱ्यांची गोकुळवर सदस्य म्हणून निवड होणार तसेच सहकारी संस्थेच्या कामकाजाशी संबंधित आवश्यक अनुभव असलेल्या आणि अर्हता धारण करणाऱ्या 4 व्यक्तींची निवड शासननियुक्त सदस्य म्हणून केली जाईल. मात्र गोकुळचा हा अध्यादेश निघताच कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलचं तापलयं. शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या मतांवर सरकारी दरोडा टाकण्याचा प्रकार असल्याची टीका आमदार सतेज पाटीलांनी केलीय.

Gokul Dairy Row In Kolhapur
Maharashtra Politics: 'जर एकत्र यायचं असेल तर आम्हाला,....'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट प्रतिक्रिया

तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाहीत मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल तुडवता? 4 नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही लक्षात ठेवा कोल्हापूरकर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही, अहंकाराची मस्ती उतरवलं, फक्त वेळ येण्याची वाट पाहतं.

तर दुसरीकडे अध्यादेश हा गोकुळवर कब्जा करण्यासाठी नव्हे तर कोरमचा तिढा सोडवण्यासाठी असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. तर कोर्टानं 10 नोव्हेंबरला अध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कोरमशिवाय अध्यक्ष निवडू शकतात असे नमूद केलेले नाही. त्यामुळे १० तारखेच्या बैठकीला शासननियुक्त सदस्य हजर राहणार असून मतदानही करतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान गोकुळवर 4 शासननियुक्त सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागू शकते?

पाहूयात.

गोकुळवर हे 4 शासननियुक्त सदस्य?

शौमिका महाडिक

नवीद मुश्रीफ

अशोक फराकटे

ए. वाय. पाटील

एकीकडे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडी कोल्हापूरचा स्वाभिमान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी 9 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत महायुती गोकुळवर आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र यावरून पेटलेला रस्त्यावरचा संघर्ष कोर्टात जाणार की सतेज पाटील वेट अँड वॉचची भूमिका घेणार याकडे लक्ष् लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.