Nashik : पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच, भाजपला का हवं नाशिकचं पालकमंत्रीपद? जाणून घ्या कारण

Nashik News in Marathi : 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाच्या रुपाने आपला विश्वासू मोहरा मैदानात उतरविला.
Nashik Guardian Minister
Nashik News in Marathi
Published On

तन्मय टिल्लू,

BJP’s plan for Nashik's 2027 Kumbh Mela : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असली तरी...गिरीश महाजनच पालकमंत्रीपदावर राहण्याची शक्यता....भाजपला नाशिक का हवंय? नेमकी भाजपची नाशिकबाबत काय रणनीती आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

नाशिकचा कुंभ भाजपला हवा?

पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील नाराजी समोर येताना दिसतेय.. रायगड आणि नाशिकवरुन महायुतीत धुसफुस सुरू झाली आहे.त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन भाजप प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय...येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०२७ च्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्त्वाचं असल्याने भाजप देखील अडून बसल्याची माहितीये. .भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद इतकं का महत्त्वाचं आहे पाहूया...

Nashik Guardian Minister
Raigad Guardian Minister: रायगडचा 'पालक' कोण? तिढा सुटणार की वेढा कायम राहणार?

भाजपाला का हवं नाशिक?

- 5 आमदार असतानाही जिल्ह्यात भाजपचा मंत्री नसल्याची उणीव

- 2027 मध्ये नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा

- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6 हजार 900 कोटींचा आराखडा

- कुंभमेळ्याचा अनुभव असल्याने भाजप गिरीश महाजनांसाठी आग्रही

- महापालिका, झेडपी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फायदा

- नाशिक महापालिका पुन्हा ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न

Nashik Guardian Minister
Aaditi Tatkare: मी पालकमंत्री असले तरी भरत शेठदेखील...; गोगावलेंचं पालकमंत्रिपद हुकल्यावरून आदिती तटकरेंचं मोठं विधान

2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाच्या रुपाने आपला विश्वासू मोहरा मैदानात उतरविला. महायुती सरकारपुढे केवळ दोन वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याचे आव्हान आहे. कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या निधीपासून साधू-महंतांची मर्जी सांभाळण्याची कसरत मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना करावी लागते. 2015-16 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री होते. आताही तीच जोडी आहे. यावरुन महायुतीत मात्र रस्सीखेच सुरु आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळा यशस्वी होत असल्याने तेवढ्याच ताकदीचा आणि यशस्वी कुंभमेळा नाशिकमध्ये करण्याची जबाबदारी महायुतीवर आहे. त्यातही एक हे तो सेफ हे चा नारा दिलेल्या भाजपसाठी कुंभमेळ्यातून आगामी राजकारणाची दिशा भाजपला ठरवता येणार आहे.. त्यादृष्टीनंसगळी सूत्र आपल्याच हाती ठेवण्यासाठी भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदावर अडून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com