
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. रायगडचे पालकमंत्रिपद अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना नेते भरत गोगावले हे नाराज झालेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. भरत गोगावलेंच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. यावरून एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 'रस्त्यावर टायर पेटवणे ही आपली संस्कृती नाही, मुख्यमंत्री आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल.', असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले आहे.
रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना सुनील तटकरे यांनी पालकमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'रायगड पालकमंत्रिपदाच्या वादावर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री बसून निर्णय घेतील. मुख्यमंत्री दाओसला गेले आहेत. परकीय गुंतवणूक आणण्यात ते यशस्वी होतील. अशावेळी राज्यात वाद निर्माण करणे उचित रहाणार नाही. मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील.'
सुनील तटकरे यांनी पुढे सांगितले की, 'बावनकुळे भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काल सांगितलं आहे. आम्ही सुसंस्कृत आहोत. आघाडी युतीच्या राजकारणामध्ये सर्वांच्या मनासारखे होईल असे नाही. राज्यात २३७ आमदारांचं पाठबळ आहे. राज्याच्या विकासाला गती देण्याची उत्तम संधी जनतेने दिली आहे. रायगड, कोकण असेल केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची संधी प्राप्त झाली आसतान मतभेद असतील पण त्याची चर्चा त्या पातळीवर झाली पाहिजे.'
सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंच्या समर्थकांनी महामार्गावर टायर जाळून आंदोलन केले या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'टायर वैगरे जाळण्याच्या घटनांमुळे संजय राऊतांसारख्यांना संधी मिळते.' यावेळी सुनिल तटकरे यांची महाडमधील शिवसेना आंदोलनावर टीका केली. पालकमंत्रिपदापासून मंत्री गोगावले यांना डावळल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबई- गोवा महामार्गावर टायर जाळून आंदोलन केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.