तबरेझ शेख, नाशिक
देशासहित राज्यातील राजकीय नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. एकीकडे मार्चआधीच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. याचदरम्यान, येत्या १५ दिवसांत राजकीय भूकंप होईल, राज्यातील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मंत्री महाजन यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गिरीश महाजन यांनी यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं. गिरीश महाजन म्हणाले, 'राज्यातील पक्ष भरकटल्याने भाजपमध्ये प्रवेश होत आहे. पक्षात अनेक मोठे नेते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्यात मोठा भुकंप होणार आहे. येत्या १५ दिवसांत मोठे प्रवेश होतील'.
आमदार अपात्रता निकालावर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले, 'मी काही भविष्यकार नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. उद्या भूकंप होणार नाही. त्यांचा न्यायालयावर विश्वास नाही. निवडणूक आयोगावर वाटेल ते बोलतात'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. यावर भाष्य करताना महाजन म्हणाले, 'मी त्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवक महोत्सव साजरा होत आहे. मी लवकरच त्यांच्याशी बोलेल'.
नाशिकमध्ये ठाकरेगटासह शरद पवार गटाला धक्का बसला. नाशिकमध्ये दोन्ही गटातील सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सरपंच उपसरपंचासह विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.
नाशिक शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन , केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.